Nashik News : नांदगावला बांधकामकडून अतिक्रमणांवर हातोडा! वाहतुकीला होणारा अडथळा दूर

Nashik News : बांधकाम विभागाच्या या कारवाईमुळे व्यावसायिकांची मोठी तारांबळ उडाली.
Encroachment removal by construction department
Encroachment removal by construction departmentesakal
Updated on

नांदगाव : येथील रेल्वे फाटकाजवळील वळणरस्त्याला वाहतुकीला अडथळा ठरणारी येवला रोड ते संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा असलेली अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम सलग दोन दिवस राबविण्यात आली. बांधकाम विभागाच्या या कारवाईमुळे व्यावसायिकांची मोठी तारांबळ उडाली. (Nashik Nandgaon action on encroachment by construction Remove obstruction to traffic marathi news)

रेल्वेच्या जुन्या फाटकावर वाहन वळविताना येणारा अडथळा दूर करण्यासाठी सुरु झालेली अतिक्रमण हटाव मोहीम पुढे गंगाधरीच्या बायपासपर्यंत राबविली जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आली. अतिक्रमणे काढून टाकण्यात आल्यानंतर मोकळ्या झालेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हाती घेण्यात आले.

महामार्ग तसेच, राज्यमार्गावर असलेल्या अतिक्रमणधारकांना महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमणे काढून घेण्याच्या नोटिसा १६ फेब्रुवारीला दिल्या होत्या. या नोटिशींशी मुदत संपली होती. मालेगाव रोड, मनमाड रोड व येवला रोड भागात मोठ्या प्रमाणात लहानमोठ्या व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटले होती.

हायवे व बांधकाम विभागाने एकाच वेळी आपापल्या हद्दीतील अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्याने विभागाच्या पुढील कारवाईकडे लक्ष लागले होते. मात्र, प्रत्यक्षात मंगळवारी व बुधवारी येवला रस्ता, छत्रपती संभाजीनगर रस्ता या भागावरच लक्ष केंद्रित करण्यात आले. दरम्यान, बहुतांशी व्यावसायिकांनी कारवाई सुरु झाल्यानंतर स्वतःहून आपली अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली.  (latest marathi news)

Encroachment removal by construction department
Nashik Marriage Registration: सुरक्षेच्या दृष्टीने विवाह नोंदणीला प्राधान्य! पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीत नोंदणीचा वाढला टक्का

कारवाई दुजाभाव झाल्याचा आरोप

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आलेली कारवाई सिलेक्टिव्ह असल्याचा आरोप विस्थापित झालेल्या व्यावसायिकांनी करताना सबवे ते जुना रेल्वे नाकादरम्यान नव्या विस्तारित रस्त्यावर झालेल्या मध्यवर्ती ठिकाणच्या अतिक्रमणांना वगळण्यात आल्याच्या प्रकाराकडे लक्ष वेधले. मात्र, येवला - संभाजीनगर रोडवरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग ठाम राहिले.

रोजगारीचा प्रश्‍न ऐरणीवर

पुढच्या टप्प्यात उर्वरित अतिक्रमणे काढली जातील, अशी भूमिका सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली आहे. त्यामुळे विभागाच्या पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे. मंगळवार व बुधवार असे दोन दिवस कारवाई झाल्याने येवला रस्ता, संभाजीनगर रस्त्याने आज मोकळा श्‍वास घेतला. मात्र, छोट्यामोठ्या व्यावसायिकांची रेलचेल थंडावली. विस्थापितांच्या रोजगारीचा मुद्दा यानिमित्ताने उपस्थितीत करण्यात आला असला तरी त्यावर तोडगा कसा व कधी निघतो, याची चर्चा या परिसरात करण्यात येत होती

Encroachment removal by construction department
Nashik News : मालेगाव सामान्य रुग्णालय होणार 300 खाटांचे! 135 कोटीच्या खर्चाला मंजुरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.