विद्यमान आमदार सुहास कांदे यांची सलग दुसऱ्यांदा विजयानंतर हॅट्रिकच्या दिशेने होणारी वाटचाल. महाविकास आघाडीकडून शिवसेना (उबाठा) पक्षाचे गणेश धात्रक यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. विरोधक असलेल्या महाविकास आघाडीकडून कोंडी होईल असे चित्र निर्माण होण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे प्रदेश अध्यक्ष समीर भुजबळ व भाजपचे पंकज खताळ यांच्याकडून उमेदवारीचे संकेत.
समीर भुजबळ व पंकज खताळ महायुतीमध्ये बंडखोरी करतील अशी चर्चा. याशिवाय डॉ. रोहन बोरसे हे तिसऱ्या आघाडीचे अथवा अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात असल्याने या लढतीला चौरंगी स्वरूप येईल अशी चर्चा. वंचितचे निर्णायक मतदान असले तरी वंचितकडून अद्याप उमेदवारीची अधिकृत घोषणा झालेली नाही. (Nandgaon Assembly Dilemma attempts by MVA)