Nashik Cloud Burst : सारताळे, जामदरी परिसरात ढगफुटीसदृश्य पावसाचा धुमाकूळ

Nashik News : नांदगाव तालुक्याच्या दक्षिण परिसरात अतिपावसामुळे पिके धोक्यात आली आहे. तर तालुक्याच्या काही भागात अजून पावसाचा थेंबही नाही.
Due to rain like cloud burst, the water in the field and road
Due to rain like cloud burst, the water in the field and road esakal
Updated on

Nashik News : नांदगाव तालुक्यातील सारताळे, जामदरी, मुळडोंगरी, कळमदरी, मळगाव, आमोदे, बोराळे परिसरात सोमवारी (ता. २४) सायंकाळी चारच्या सुमारास अवघ्या ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. आठ दिवसांच्या अंतराने दुसऱ्यांदा असा पाऊस झाल्याने पंधरा दिवसांचे कोवळे खरीप पिक धोक्यात आले आहे. (cloudburst in Sartale Jamdari area)

नांदगाव तालुक्याच्या दक्षिण परिसरात अतिपावसामुळे पिके धोक्यात आली आहे. तर तालुक्याच्या काही भागात अजून पावसाचा थेंबही नाही. या ठिकाणी शेतीतील ढेकूळही फुटलेले नाही.

११ मे रोजी झालेल्या अवकाळी पावसाने साकोरा परिसराला जीवदान ठरणारा मोरखडी बंधारा ५० टक्के भरला होता. (latest marathi news)

Due to rain like cloud burst, the water in the field and road
Nashik Monsoon : पावसाच्‍या हजेरीने रविवार ठरला सुखद! दिवसभर रिमझिम बरसल्‍याने वातावरणात गारवा

तेव्हा साकोरा परिसरातील थोड्याफार प्रमाणात पाण्याचा प्रश्‍न सुटला होता. एक महिन्यानंतर ११ जून रोजी पाऊस बरसल्याने पेरणी झाली.

१७ जून रोजी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आणि परत अवघ्या आठ दिवसांनी ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले. शेतातील बांध, नाला बल्डिंग बंधारे ओसंडून वाहायला लागले. अर्धा तास साकोरा-वेहेळगाव रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.

Due to rain like cloud burst, the water in the field and road
Nashik Monsoon News : दमदार पावसाने शेतमजुरांच्या हाताला काम; कसमादे पट्ट्यातील शेतीकामांना वेग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.