Nashik News: नांदगाव शहरातील गाळ्याच्या लिलावात पालिकेला कोटीचा महसूल! उत्पन्नात ५ कोटी ५५ लाखाची भर

Nashik News : नांदगाव शहरातील महात्मा फुले चौकातील फुले चौक येथील सिटी सर्वे नंबर २५२४ मधील शॉपिंग सेंटरच्या गाळ्यांचे जाहीर भाडेकरार लिलाव प्रक्रिया झाली.
Businessmen bidding at a shopping center brick auction
Businessmen bidding at a shopping center brick auctionesakal
Updated on

बाणगाव बुद्रूक : नांदगाव शहरातील महात्मा फुले चौकातील फुले चौक येथील सिटी सर्वे नंबर २५२४ मधील शॉपिंग सेंटरच्या गाळ्यांचे जाहीर भाडेकरार लिलाव प्रक्रिया झाली. यात लिलावातून पालिकेच्या महसुलात कोट्यवधीची भर पडली. लिलावातून पालिकेला पाच कोटी तर सर्वाधिक मोठी बोली ही ५१ लाख ४० हजाराची लागली. (nashik nandgaon municipal corporation marathi news)

मंगळवारी (ता.२१) नांदगाव नगरपरिषदेच्यावतीने शहरातील जैन धर्मशाळेत महात्मा फुले चौक येथील सिटी सर्वे नंबर २५२४ मधील शॉपिंग सेंटरच्या गाळ्यांचे जाहीर भाडेकरार लिलाव प्रक्रिया मुख्याधिकारी विवेक धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी मंडळ अधिकारी यांच्या उपस्थितीत इन कॅमेरा घेण्यात आली.

शॉपिंग सेंटर तळमजल्यावरील सर्व गाळ्यांचे, व पहिल्या मजल्यावरील सर्व गाळ्यांचे, तसेच दुसऱ्या मजल्यावरील दोन गाळ्यांचे लिलाव झाले. यात एकूण ७३ गाळ्यांपैकी ४६ गाड्यांचे लिलाव पूर्ण झाले आहेत. यात सर्वोच्च बोली आसाराम दुबे (रक्कम ५१ लाख, ४० हजार रुपये) यांनी लावली या लिलाव प्रक्रियेत एकूण ना परतावा अनामत रक्कम ५ कोटी ५०लाख ५० हजार महसूल पालिकेला प्राप्त झाला. (Latest Marathi News)

Businessmen bidding at a shopping center brick auction
Nashik News : गोष्ट एका ‘रेशनकार्ड’ची! तहसीलदारांच्या समयसूचकतेने वाचला रुग्णाचा जीव

लिलाव प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी नांदगाव नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी मुक्ता कांदे, करनिरीक्षक राहुल कुटे, लेखापाल संतोष ढोले, लेखा परीक्षक सतीशकुमार खैरे, प्रकल्प अधिकारी आनंद महिरे, संगणक अभियंता रोशनी मोरे, वरिष्ठ लिपिक विजय कायस्थ, बी.बी.शिंदे, अरुण निकम, अंबादास सानप, रामकृष्ण चोपडे, आकाश जाधव, दीपक वाघमारे, अनिल पाटील, सुनील पवार, नीलेश देवकर यांनी मेहनत घेतली.

१५ दिवसात करारनामे करा

लिलावात यशस्वी बोली धारकांनी गाळा व ओटे धारकांनी पुढील पंधरा दिवसात करारनामे करून द्यावेत. तसेच शॉपिंग सेंटरची किरकोळ दुरुस्ती करून सर्व ओटे व गाळे लवकरच व्यवसायासाठी चालू करून देण्यात येणार आहे असे मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी यावेळी सांगितले.

Businessmen bidding at a shopping center brick auction
Nashik News: ऊसतोडणी कामगार घरी साजरी करणार होळी! साखर हंगाम संपत असल्याने कामगार सणापूर्वीच गावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.