Mrs Asia Pacific World : मिसेस एशिया पॅसिफिक वर्ल्डचा मुकुट नंदिनी राजपूतने पटकावला! नाशिकचे नाव झळकणार सातासमुद्रापार

Nashik News : नंदिनी राजपूत-गावंडे यांची ही कामगिरी संपूर्ण नाशिककरांसाठी अभिमानास्पद अशी ठरली असून आता त्या कॅनडामध्ये होणाऱ्या कॉसमॉस वर्ल्ड वाइड ब्युटी या जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
Nandini Rajput-Gawande
Nandini Rajput-Gawandeesakal
Updated on

नाशिक : रियामा फाउंडेशनकडून इंदोर शहरात झालेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील मिस आणि मिसेस एशिया पॅसिफिक वर्ल्ड २०२४ या सौंदर्यवतींच्या स्पर्धेतील मिसेस एशिया पॅसिफिक वर्ल्ड २०२४ मुकुट नाशिकच्या नंदिनी राजपूत-गावंडे यांनी पटकावला आहे.

नंदिनी राजपूत-गावंडे यांची ही कामगिरी संपूर्ण नाशिककरांसाठी अभिमानास्पद अशी ठरली असून आता त्या कॅनडामध्ये होणाऱ्या कॉसमॉस वर्ल्ड वाइड ब्युटी या जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. (Nashik Nandini Rajput gawande crowned Mrs Asia Pacific World)

नाशिकमध्ये बँक मॅनेजर म्हणून कार्यरत असलेल्या नंदिनी राजपूत-गावंडे यांनी मिसेस एशिया पॅसिफिक वर्ल्ड २०२४ चा ताज पटकाविल्याने नाशिकचे नाव मॉडेलिंगच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले आहे. इंदोर शहरातील हॉटेल ग्रँड शेरेटनमध्ये गेल्या आठवड्यात शनिवारी रात्री ही स्पर्धा परीक्षक अभिनेत्री जया प्रदा, आदिती गोवित्रीकर आणि इंडियन आयडॉल फेम आद्या मिश्रा यांच्या उपस्थितीत झाली.

सौंदर्यासोबतच व्यक्तिमत्त्वाचे कौशल्य, बुद्धिमत्ता आणि स्थानिक संस्कृतीची जाणीव अशा विविध क्षमतांचा कस पाहणाऱ्या या सौंदर्य स्पर्धेत १८ ते ५५ या वयोगटातील जगभरातील ३० सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. प्रिया शुक्ला आणि निरुपमा शर्मा यांनी दिग्दर्शन केलेल्या या स्पर्धेत स्वपरीचय, बुद्धिमत्ता, पोजिंग स्किल्स, कॅटवॉक, ट्रॅडिशनल अँड नॅशनल कॉस्च्युम राउंड अशा विविध फेऱ्यांतून या स्पर्धकांना आपल्या सौंदर्यासोबतच अंगभूत कौशल्यांचे सादरीकरण करावे लागले.

बासरीच्या धूनवरील रॅम्प वॉक हे या सौंदर्य स्पर्धेचे खास वैशिष्ट्य ठरले. स्पर्धकांनी वेस्टर्न आऊटफिट ते पारंपारिक वेशभूषेतील केलेले सादरीकरण डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले. तिन्ही परीक्षकांनी या स्पर्धेचा मुकुट नंदिनी राजपूत-गावंडे यांच्या डोक्यावर चढवला. (latest marathi news)

Nandini Rajput-Gawande
Success Story: महिलांच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या ‘योगिनी’ ; योग अभ्यासाच्या वर्गातून मिळविला रोजगार!

स्पर्धेत प्रत्येक स्पर्धकाला एका फेरीत कोणत्याही एका देवीचे रुप सादर करावयाचे होते. नंदिनी राजपूत-गावंडे यांनी बासरी आणि सुफी बँड या लाइव्ह बँडच्या सुरांत पारंपारिक वेशभूषेत भारतमातेचे रूप सादर केले. पाठीमागे भारताची विविधतेतील एकतेचा संदेश देणारे सर्वधर्मीयांच्या प्रार्थना स्थळांचे प्रतीके या स्पर्धेचे वेगळेपण ठरले. नंदिनी राजपूत - गावंडे यांनी विविधतेतील एकतेचे दर्शन घडवून परीक्षांना या स्पर्धेचा ताज बहाल करण्यास भाग पाडले.

१६ महिन्यांच्या कष्टाचे चीज

या सौंदर्य स्पर्धेची माहिती मिळाल्यावर नंदिनी राजपूत-गावंडे यांनी नाव नोंदणी केली. नोकरी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून तब्बल १६ महिने कसून तयारी केली. वजन कमी करण्याचे लक्ष्यही साध्य केले. पती डॉ. अनुप गावंडे, दीर अनिकेत गावंडे, सासू, सासरे, आई यांच्या खंबीर आणि सकारात्मक पाठिंब्यासह डॉ. प्रिया आहेर, डॉ. काश्मी, राणी यांचे मार्गदर्शन, मैत्रिणी हेमल ठक्कर, आरती सेठ यांचे सहकार्य उपयुक्त ठरले. मुंबई, पुणे येथे कॉस्च्युम निवडला परंतु अंतिम निवड मात्र इंदोर शहरातच केली.

"बालपणापासूनच मॉडेलिंगची आवड होती. मात्र स्पर्धेत भाग घेण्याची ही पहिलीच वेळ होती. या स्पर्धेचे आव्हान पेलणे अर्थात सोपे नव्हतेच. नोकरी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून या स्पर्धेची तयारी केली. पती डॉ. अनुप गावंडे, दीर अनिकेत गावंडे यांचे सहकार्य, लहान जुळी मुले रावी आणि ऋषी यांचा त्याग, कुटुंबीयांचा आणि मैत्रिणींचा पाठिंबा खूप महत्त्वाचा ठरला. देशाचे प्रतिनिधित्व आता पुढील स्पर्धेत करायला मिळणार असल्याचा गर्व वाटतो."

- नंदिनी राजपूत-गावंडे

Nandini Rajput-Gawande
Nashik Inspirational Story : खचलेल्या मनांसाठी ‘आयडॉल’ बनलेल्या सासू-सून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.