Nashik News : 5 वर्षात आजी-माजी आमदारांना सभेचे यजमानपद; शरदचंद्र पवार बाजार आवारात नरेंद्र मोदींची उद्या सभा

Nashik News : पिंपळगाव येथे उद्या (ता. १५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे.
Mahayuti candidate  MLA Dilip Bankar filing the application for of Bharti Pawar.
Mahayuti candidate MLA Dilip Bankar filing the application for of Bharti Pawar.esakal
Updated on

सुदर्शन सारडा : सकाळ वृत्तसेवा

ओझर : पिंपळगाव येथे उद्या (ता. १५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. पाच वर्षांपूर्वी याच ठिकाणी झालेल्या सभेला तत्कालीन आमदार अनिल कदम यांनी यजमानपद स्वीकारत नियोजनात चोख भूमिका पार पाडली होती. यंदा मात्र राजकीय फोडाफोडीमुळे विद्यमान आमदार दिलीप बनकर हे महायुतीत सहभागी झाल्यामुळे ते त्यांच्या मायभुमीत दोन्ही उमेदवारांसाठी मोदींचे स्वागत करतील. (Nashik Narendra Modi)

पाच वर्षांपूर्वी एप्रिल महिन्याच्या तळपत्या उन्हात पंतप्रधान मोदींची सभा झाली होती. तेव्हा तत्कालीन आमदार अनिल कदम यांनी त्यांच्यातल्या मॅनेजमेंट कौशल्याची चुणूक दाखवत स्वतः उभे राहून सर्व सभेचे सोपस्कार पूर्ण केले. शिवाय ती मतात रूपांतरही करून दाखवली होती. गेल्या वर्षभरात राजकीय कालचक्र बदलले.

ज्या शरदचंद्र पवार कृषि उत्पन्न बाजार समिती आवारात सभा झाली, त्याच जागेला यंदा पुन्हा पसंती मिळाल्याने ती जबाबदारी आता स्थानिक आमदार म्हणून दिलीप बनकर यांच्यावर आली आहे. दुसरीकडे माजी आमदार अनिल कदम तुतारी फुंकणाऱ्या माणसासोबत असल्याने येणारा आठवडा कमालीचा उत्कंठावर्धक असणार, यात दुमत नाही.

कांदाप्रश्‍न ठरला औचित्याचा मुद्दा

शरद पवारांच्या नावावर असलेल्या मार्केट कमिटीत होणाऱ्या सभेकडे त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले नरेंद्र मोदी कोणत्या मुद्द्याला हात घालतात, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. पाच वर्षांपूर्वी कांदाप्रश्‍न ऐरणीवर असताना तेव्हा तो आज इतका चिघळला नव्हता. त्यावेळी टाईम पाहून मोदींनी आपल्या भाषणात त्याचा विशेष उल्लेख करून उपस्थितांना आश्‍वासित केले होते. (latest marathi news)

Mahayuti candidate  MLA Dilip Bankar filing the application for of Bharti Pawar.
Nashik News : महापालिकेसह स्मार्टसिटी कंपनी, जिल्हाधिकाऱ्यांना अवमान नोटीस!

त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले अन् पुन्हा पाच वर्षानंतर तोच कांदा त्याच ठिकाणी महायुतीचा औचित्याचा प्रश्‍न बनून उभा आहे. त्यावर मोदी नेमके काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष्य लागले आहे. एकूणच शरदचंद्र पवार बाजार आवारात होणाऱ्या मोदींच्या सभेचे मुद्दे नेमकी कांदा निर्यात हवेतून करतात की जमिनीवरून हे लवकरच कळेल.

प्रेरणास्थान अन् श्रद्धास्थान

दिलीप बनकर हे शरदचंद्र पवार बाजार समितीचे सभापती आहेत. त्यांच्याच काळात बाजार समितीचे नामकरण झाले. ते शरद पवारांचे विश्‍वासू निकटवर्तीय असताना त्यांनी अजित पवारांची साथ दिल्याने यशवंतराव चव्हाण त्यांचे प्रेरणास्थान झाले. तर अनिल कदम यांचे श्रद्धास्थान शरद पवार होणे आपसूक आलेच.

आजही ज्या खुर्चीवर बसून बनकर निर्णय घेतात त्यांच्या मागे शरद पवारांची फेट्यातली प्रतिमा तशीच आहे. दुसरीकडे प्रतिस्पर्धी अनिल कदम सध्या शरद पवारांच्या सर्वात जवळचे मानले जातात. आजमितीस जिल्ह्यात महाविकास आघाडीत ज्या महत्वाच्या घडामोडी घडल्या त्यात अनिल कदम यांचा शब्द पवारांनी प्रमाण मानला.

त्यामुळेच आघाडी धर्म पाळत उद्धव ठाकरेंचे विश्‍वासू कदम जेव्हा शरद पवारांच्या जवळ गेले तेव्हा अजित पवारांचे खंदे समर्थक बनकर यांची नरेंद्र मोदींवरील प्रेरणा जागरूक होणे क्रमप्राप्तच म्हणावे. त्यामुळेच एकवेळ भूकंपाचा केंद्रबिंदू सापडेल पण, निफाडच्या राजकारणाचा केंद्रबिंदू अनेकांना उमगत नाही, तो यामुळेच.

Mahayuti candidate  MLA Dilip Bankar filing the application for of Bharti Pawar.
Nashik Accident News : घंडागाडीला धडकून वृद्ध महिला ठार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.