Nashik Family Court : नाशिकला हवे आणखी एक कौटुंबिक न्यायालय! नाशिक बार कौन्सिलची उच्च न्यायालयाकडे मागणी

Nashik News : प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी, तसेच कामकाज जलदगतीने होण्यासाठी नाशिक येथे आणखी एक कौठुंबिक न्यायालय कार्यरत करावे, अशी मागणी नाशिक बार कौन्सिलच्या वतीने मुंबई उच्च् न्यायालयाच्या कौठुंबिक न्यायालयाच्या पालक न्यायमूर्तींकडे करण्यात आली आहे.
Family Court
Family Courtesakal
Updated on

Nashik Family Court : नाशिक रोड येथे कौठुंबिक न्यायालय असून, सद्यस्थितीमध्ये या न्यायालयात मोठ्याप्रमाणात कौटुंबिक खटले प्रलंबित आहेत. तसेच नव्याने कौठुंबिक दावे दाखल होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी, तसेच कामकाज जलदगतीने होण्यासाठी नाशिक येथे आणखी एक कौठुंबिक न्यायालय कार्यरत करावे, अशी मागणी नाशिक बार कौन्सिलच्या वतीने मुंबई उच्च् न्यायालयाच्या कौठुंबिक न्यायालयाच्या पालक न्यायमूर्तींकडे करण्यात आली आहे. (Nashik Nashik needs another family court)

नाशिक बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे व पदाधिकाऱ्यांच्या वतीने महाप्रबंधकांमार्फत कौटुंबिक न्यायालयाच्या पालक न्यायमूर्ती न्या. श्रीमती भारती डोंगरे यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यानुसार, नाशिक येथील कौटुंबिक न्यायालयात सद्यस्थितीमध्ये दिवाणी स्वरुपाचे ३ हजार १००, फौजदारी स्वरुपाचे १ हजार ५०० व अन्य स्वरुपाचे मिळून सुमारे ५ हजार न्यायलयीन प्रकरणे प्रलंबित आहेत.

या न्यायालयाकडे दररोज किमान सव्वाशे ते दीडशे खटले सुनावणीसाठी असतात. तर, न्यायालयात दररोज १५ ते २० वाद हे हिंदू विवाह कायदा कलम १३ ब प्रमाणे दाखल होत असतात. त्यासाठी न्यायालयास वेळ देणे आवश्यक असते. (latest marathi news)

Family Court
Rahul Gandhi Speech : लोकसभेतील भाषणाचे अंश वगळल्याने राहुल गांधी संतप्त! लोकसभाध्यक्षांना पत्र लिहीत व्यक्त केली नाराजी

त्यामुळे बहुतांशी प्रकरणांना तीन ते चार महिन्यांनंतरच्या तारखा द्याव्या लागतात. त्यातच न्यायालयीन कर्मचाऱ्याचे मनुष्यबळ पुरेसे नाही. न्यायालयीन कामकाज जलदगतीने होण्यासाठी, तसेच, पक्षकारांनाही न्याय वेळेत मिळावा यासाठी नाशिक येथे आणखी एक कौटुंबिक न्यायालय कार्यरत करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.

"कौटुंबिक न्यायालयाकडे मोठ्याप्रमाणात खटले प्रलंबित आहेत. दाखल खटल्यांचे प्रमाण अधिक असल्याने खटले निकाली निघत नाहीत. त्यामुळे याठिकाणी आणखी एक कौटुंबिक न्यायालयात कार्यरत करण्याची मागणी बार कौन्सिलतर्फे करण्यात आलेली आहे. तसे झाल्यान खटले निकाली निघण्याचे प्रमाण वाढू शकेल."

- ॲड. हेमंत गायकवाड, सचिव, नाशिक बार कौन्सिल.

Family Court
PM Modi: मोदी बोलायला उभे राहताच विरोधकांचा मोठा गोंधळ; लोकसभा अध्यक्ष विरोधकांवर प्रचंड संतापले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.