नाशिक : नाशिकमधील गणेशोत्सवाचे भाविकांमध्ये खास आकर्षण असते ते अशोकस्तंभ परिसरातील भव्यदिव्य अशा ‘नाशिकचा राजा’ गणरायाचे. शहरातील नव्हे तर जिल्हा व परजिल्ह्यातून ‘नाशिकचा राजा’चे दर्शन घेण्यासाठी येत असतात.
यंदा, शुक्रवारी (ता. ५) भाविकांना आपल्या लाडक्या ‘नाशिकचा राजा’चे मुखदर्शन घेता येणार आहे. यावेळी ढोल-ताशांचा गजर अन् फटाक्यांच्या आतषबाजीत गणरायाचे स्वागत केले जाणार आहे. (Nashikcha Raja mukh darshan on Friday)