Nashik News : शिंगवे गाव दररोज होते स्तब्ध; 2 वर्षांपासून सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी वाजते राष्ट्रगीत

Nashik : धार्मिक स्थळांमध्ये नियमितपणे भजन, कीर्तन होणे, ही काही नवीन गोष्ट नसली, तरी गावात ‘जन गण मन’ नियमितपणे ऐकायला मिळाले, तर गाव देशासारखे भासू लागते. हे करून दाखविले आहे शिंगवे ग्रामस्थांनी.
Villagers standing still when the National Anthem starts.
Villagers standing still when the National Anthem starts.esakal
Updated on

Nashik News : धार्मिक स्थळांमध्ये नियमितपणे भजन, कीर्तन होणे, ही काही नवीन गोष्ट नसली, तरी गावात ‘जन गण मन’ नियमितपणे ऐकायला मिळाले, तर गाव देशासारखे भासू लागते. हे करून दाखविले आहे शिंगवे ग्रामस्थांनी. गोदाकाठी वसलेल्या गावात दररोज सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी ग्रामपालिकेसमोर आलेल्या लाऊडस्पीकरवर राष्ट्रगीत लावले जाते. त्याचा सर्व व्यापारी आणि ग्रामस्थ मान राखतात. (nashik National Anthem is played from 9 am to 10 minutes for 2 years )

त्यामुळे शिंगवे महाराष्ट्रातील दुसरे नियमित राष्ट्रगीत वाजविणारे गाव बनले आहे. तत्कालीन ग्रामपालिका सदस्य रामेश्वर मोगल व धोंडिराम रायते यांनी ही संकल्पना मांडली. त्यास तत्कालीन मंडळाने अनुमती दिली. सकाळी नऊ वाजून १० मिनिटांनी लोक थांबतात आणि काही कालावधीसाठी गाव स्तब्ध होते.

नवख्या व्यक्तीसाठी हे आश्चर्यचकित होण्यासारखेच. मात्र, इथल्या ग्रामस्थांसाठी आपल्या देशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयोग आहे. २६ जानेवारी २०२२ पासून सहा हजार लोकसंख्या असलेल्या शिंगवेत लाऊडस्पीकरवर ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत रोज वाजवण्यास सुरवात झाली. देशभक्तीचा उत्साह काही दिवसांत किंवा आठवड्यातून कमी होईल, असे तेव्हा काहींना वाटले. (latest marathi news)

Villagers standing still when the National Anthem starts.
Nashik News : प्रवाशांच्या गर्दीमुळे विशेष साप्ताहिक रेल्वे

मात्र, हे खोटे ठरले. तत्कालीन सरपंच योगेश कटारे, रामेश्वर मोगल, धोंडिराम रायते, संजय डेर्ले, लक्ष्मण पवार, अर्जुन डेर्ले, अनिता कोरडे, ललीता कोरडे, सुनंदा गिते, अहिल्याबाई मोगल, अलका अवारे, बेबी रायते, पूनम सानप यांनी सुरू केलेला हा उपक्रम विद्यमान सरपंच सुनंदा पवार, उपसरपंच जयश्री रायते व सदस्यांनी सुरू ठेवला आहे. राष्ट्रगीत सुरू होताच ग्रामस्थ उभे राहतात, तर वाहनांतील नागरिक राष्ट्रगीतासाठी खाली उतरतात.

''हे यशस्वी करण्याचे श्रेय इथल्या लोकांना जाते. ज्यांनी केवळ पुढाकार घेतला नाही,तर दोन वर्षे देशभक्तीची भावना त्यांनी यशस्वी करून दाखवली. बरेच लोक २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टलाच उभे राहतात. चित्रपटगृहात राष्ट्रगीताला मान देण्यासाठी काही लोक उभे राहतात. त्यामागे कायद्याचा धाक असेल. मात्र, या छोट्याशा गावाने खूप सकारात्मक संदेश दिला आहे.''-रामेश्वर मोगल व धोंडीराम रायते, शिंगवे

Villagers standing still when the National Anthem starts.
Nashik News : खमंग ढोकळ्याच्या पायी विक्रीतून सुटतोय पोटाचा प्रश्न! नरकोळ जाखोड परिसरात चंदनसिंगची चिमुकले पाहतात वाट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.