Digital Health Education : वैद्यकीय शिक्षणाबरोबर तंत्रज्ञानाचा उपयोग करून आरोग्य सेवेचा दर्जा उंचावणे, अधिक तत्परतेने सेवा प्रदान करण्यासाठी भावी डॉक्टरांना प्रशिक्षित केले जाणार आहे. ‘डिजिटल आरोग्य शिक्षणा’ला चालना देण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि नॅशनल हेल्थ ॲथॉरिटी यांच्यात बुधवारी (ता. १४) नवी दिल्लीतील निर्माण भवनात सामंजस्य करार झाला. आरोग्य क्षेत्रात प्रभावी सेवा देण्यासाठी डिजिटल आरोग्य शिक्षणाला चालना देणारा करार महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला. (National Health Authority to boost Digital Health Education )