Nashik Women Vehicle Drivers : आम्‍ही नवदुर्गा- ‘तिच्या’ सारथ्यामुळे संसार अन प्रवास सुखकर

Latest Navratri 2024 News : सारथ्य करताना प्रवाशांचा प्रवास सुखकर बनविण्यासाठी त्‍या अथक परिश्रम घेताना दिसतात. महिलांचे श्रम लक्षात घेता, सामाजिक संस्‍थांसमवेत शासनानेही आता पिंक रिक्षा योजना उपलब्‍ध करून दिलेली आहे.
Meena Landge & Kirti ghuge
Meena Landge & Kirti ghugeesakal
Updated on

Nashik Women Vehicle Drivers : रस्‍त्‍यावर धावणारी रिक्षा असेल किंवा बसगाडी, या सार्वजनिक वाहतुकीच्‍या क्षेत्रात महिला चालक महत्त्‍वाची भूमिका बजावत आहेत. सारथ्य करताना प्रवाशांचा प्रवास सुखकर बनविण्यासाठी त्‍या अथक परिश्रम घेताना दिसतात. महिलांचे श्रम लक्षात घेता, सामाजिक संस्‍थांसमवेत शासनानेही आता पिंक रिक्षा योजना उपलब्‍ध करून दिलेली आहे. (navratri 2024 women drivers)

सार्वजनिक वाहतूक व्‍यवस्‍थेत काम करताना चालक महिलांना रोजच हजारो नागरिकांचा सामना करावा लागतो. अशात चालक म्‍हणून बहुतांश वेळा त्‍यांच्‍यावर विश्‍वास दाखविला जात नाही. ‘ही महिला आहे, गाडी बरोबर चालवेल का’ अशी शंका उपस्‍थित केली जाते. रस्‍त्‍यावरील काही वाहनचालक महिला चालकांना बघून घाबरतात, तर काही वाहनचालक या चालकांना घाबरविण्याचा प्रयत्‍न करतात.

परंतु आव्‍हाने कितीही असो, प्रवाशांचा प्रवास सुखकर व्‍हावा, यासाठी महिला चालक सचोटीने प्रयत्‍न करताना दिसतात. सिटी लिंक, एसटी महामंडळाच्‍या बसगाड्यांमध्ये महिला चालक आहेत. यासोबतच विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा, व्‍हॅनचे स्टिअरिंग महिलांच्‍या हाती आहे.

व्‍यसनाधिनतेपासून दूर असणाऱ्या या महिला चालक सुरक्षित प्रवासाची हमी घेत आहेत. शहराच्‍या रस्‍त्‍यावर धावणाऱ्या पिंक रिक्षा लक्षवेधी ठरत असून, या रिक्षाच्‍या चालकही महिला आहेत. अल्‍पावधीत त्‍यांना प्रवाशांचा प्रतिसाद वाढतो आहे. त्‍यांच्‍या रिक्षामध्ये प्रवास करताना विशेषतः महिला प्रवाशांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते. (latest marathi news)

Meena Landge & Kirti ghuge
Nashik Women Traffic Police: कौटुंबिक जबाबदारी पेलून शहराच्या वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावणाऱ्या महिला वाहतूक पोलीस!

"बऱ्याच वेळा इतर चालकांकडून भीती व्‍यक्‍त होते. काहीवेळा प्रवासीही साशंक असतात. परंतु एकदा बसमध्ये प्रवास केल्‍यानंतर त्‍यांच्‍यामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते. महिला चालक म्‍हणून अनेकजण सोबत सेल्‍फी घेतात. समाज माध्यमांमध्ये माहिती अपलोड करतात. अशावेळी आपण घेत असलेल्‍या कष्टाचे चीज झाल्‍यासारखे वाटते."- मीना लांडगे, सिटीलिंक बसचालक.

"विद्यार्थी, प्रवाशांची वाहतूक करताना प्रतिसाद वाढता आहे. महिला प्रवाशांना सुरक्षित वाटत असल्‍याने त्‍या पिंक रिक्षाला प्राधान्‍य देतात. चालक म्‍हणून वेगवेगळी आव्‍हाने येतात, परंतु प्रवासी हिताचे काम करत असताना, अडचणींकडे दुर्लक्ष करत अधिकाधिक प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्याचा प्रयत्‍न असतो." - कीर्ती घुगे, पिंक रिक्षाचालक.

Meena Landge & Kirti ghuge
Nashik Female Security Guard : आम्ही नवदुर्गा - स्वत:च्या सुरक्षिततेसह महिलांचेही रक्षण

Related Stories

No stories found.