Nashik Crime : राष्ट्रवादी- भाजपमधील काका- पुतण्याचे बॅनर जाळले! अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा

Latest Crime News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाना महाले व भाजपचे माजी नगरसेवक राजेंद्र महाले यांच्या संपर्क कार्यालयावर लावलेला नामफलक काही अज्ञात व्यक्तींनी सोमवारी (ता. ७) पहाटे जाळून टाकल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Burned banners at Maharana Pratap Chowk
Burned banners at Maharana Pratap Chowkesakal
Updated on

सिडको : सिडकोमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप पदाधिकाऱ्यांचे बॅनर अज्ञाताने जाळल्याची घटना घडली. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. (Nashik NCP BJP uncle nephew banner burnt)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाना महाले व भाजपचे माजी नगरसेवक राजेंद्र महाले यांच्या संपर्क कार्यालयावर लावलेला नामफलक काही अज्ञात व्यक्तींनी सोमवारी (ता. ७) पहाटे जाळून टाकल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असलेले नाना महाले यांनी नुकतेच शरद पवार पक्षात प्रवेश केला आहे.

तर पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले माजी नगरसेवक राजेंद्र महाले यांनीदेखील नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नाना महाले हे राजेंद्र महाले यांचे काका आहेत. दोन्ही काका- पुतणे विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करत आहेत. परंतु त्यांचे दोघांचे पक्ष वेगवेगळे आहेत. (latest marathi news)

Burned banners at Maharana Pratap Chowk
Nashik Crime News : फेसबुकवर अश्‍लील मजकूर; संशयिताविरोधात गुन्‍हा दाखल

त्यामुळे काका- पुतण्याचे बॅनर जाळल्याने समर्थक चांगलेच चिडले आहेत. अंबड पोलिस ठाण्यामध्ये नाना महाले यांचे चिरंजीव अमोल महाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भाचा सीसीटीव्ही फुटेजदेखील हाती लागले आहेत. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत.

घटनेनंतर नाना महाले म्हणाले, की सदर प्रकार हा विकृत मानसिकता असणाऱ्या व्यक्तींनी केलेला आहे. पोलिस गुन्हेगारांना शोधून काढतील. पोलिसांना आमचे नेहमी सहकार्य असेल. तर राजेंद्र महाले म्हणाले, की, महाराणा प्रताप चौकात संपर्क कार्यालयात नामफलक लावण्यात आलेले होते. सोमवारी पहाटे अज्ञात व्यक्तीने तो जाळला. याबाबत पोलिस तपास करत आहेत.

Burned banners at Maharana Pratap Chowk
Nagpur Crime News: 'तो' मारत सुटला, दोघांचा जीव घेतला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.