Nashik News : नाशिकमध्ये राष्ट्रवादीला खिंडार; नाना महालेंसह अनेक कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात

Nashik : लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज असल्याचे दिसून येत आहे.
Nana Mahale, along with Gajanan Shelar, Gokul Pingle, Nitin Bhosle etc. entered the party in the presence of senior leader Sharad Pawar.
Nana Mahale, along with Gajanan Shelar, Gokul Pingle, Nitin Bhosle etc. entered the party in the presence of senior leader Sharad Pawar.esakal
Updated on

Nashik News : लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज असल्याचे दिसून येत आहे. यातच शहरातील सिडकोमधील मंत्री छगन भुजबळ यांचे खंदे समर्थक नाना महाले यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह रविवारी (ता.७) शरद पवार यांच्या उपस्थितीत गोविंदबाग (बारामती) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला आहे. महाले यांच्या प्रवेशामुळे सिडकोत अजित पवार गटाला खिंडार पडले आहे. (NCP has been defeated by many activists including Sharad Pawar)

राज्यात झालेल्या सत्तांततरानंतर नाशिकमधील आमदार, पदाधिकाऱ्यांनी पवारांची साथ सोडून अजित पवारांना साथ दिली. परंतु, लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाल्याने अनेक पदाधिकारी आता परतण्याच्या मनःस्थितीत दिसून येत आहे. लोकसभा निवडणूकीनंतर अनेक नेते नाराज असल्याचीही चर्चा आहे. अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांचे नाना महाले, मकरंद सोमवंशी, माजी नगरसेवक दत्ता पाटील हे समर्थक होते. (latest marathi news)

Nana Mahale, along with Gajanan Shelar, Gokul Pingle, Nitin Bhosle etc. entered the party in the presence of senior leader Sharad Pawar.
Nashik News : आमदारांनीच गाजवली ‘डीपीडीसी’; निधी खर्चाची मतदारसंघनिहाय आकडेवारीची थेट मागणी

नाना महाले सह शेकडो कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटात प्रवेश केल्याने अजित पवार गटाला खिंडार पडले आहे. बारामती येथे कार्यक्रम प्रसंगी नाशिक मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष गजानन शेलार, जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, माजी आमदार नितीन भोसले, गोकुळ पिंगळे, पुरषोत्तम कडलग, श्‍याम हिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी सिडकोतील पक्षाचे जेष्ठ नेते नाना महाले, दत्ता पाटील, सागर मोटकरी,मकरंद सोमवंशी,दादा कापडणीस, सुनील आहिरे, अक्षय परदेशी, राहुल कमानकर, ज्ञानेश्वर महाजन, अरूण निकम, राजू पवार गणेश जाधव, राजू उशीर, सुनील पाटील, उमेश चव्हाण, अमित पाटील, अमोल पैठणकर, सागर पाटील आदींसह शेकडो सक्रिय पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला.

Nana Mahale, along with Gajanan Shelar, Gokul Pingle, Nitin Bhosle etc. entered the party in the presence of senior leader Sharad Pawar.
Nashik News : मातब्‍बरांकडून उमेदवारी अर्ज दाखल; पुढाऱ्यांची ‘एंट्री’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.