दिड वर्षापासून नाशिकमध्ये कोरोना उच्छाद कायम आहे. कोरोनाचा संर्सग दर आटोक्यात असला तरी, कोरोनाची दैनंदिन संख्या विशिष्ठ पातळीच्या खाली जात नाही.
नाशिक : कोरोनाच्या (Corona) तिसऱ्या लाटेची टांगती तलवार कायम आहे. त्याचवेळी सततच्या लॉकडाउनला (Lockdown) लोक कंटाळले आहे. अशा स्थितीत दैनंदिन व्यवहार पूर्ववत होण्यासाठी लसीकरण (vaccines) हाच पर्याय आहे. पण लसीकरण पूर्णत्वासाठी ७२ लाख लोकसंख्येच्या नाशिक जिल्ह्याला १५ तारखेपर्यत लसीकरण पूर्ण करायचे झाल्यास, ७२ लाख लोकसंख्येच्या नियोजनासाठी प्रतिदिन ३०६०७ (ग्रामीण) १२१३१ (नाशिक शहर) ३५७५ (मालेगाव शहर) याप्रमाणे शहर जिल्ह्यासाठी प्रतिदिन ४६३२१ डोसची गरज आहे. मात्र लसीकरणाचा राष्ट्रीय कार्यक्रम काही नगरसेवकांनी केंद्रावरील हस्तक्षेपामुळे प्रचार कार्यक्रम बनविला आहे.
दिड वर्षापासून नाशिकमध्ये कोरोना उच्छाद कायम आहे. कोरोनाचा संर्सग दर आटोक्यात असला तरी, कोरोनाची दैनंदिन संख्या विशिष्ठ पातळीच्या खाली जात नाही. त्यामुळे कोरोना वाढत नसला तरी, कमी होत नाही. ही प्रमुख चिंता कायम आहे. सततच्या लॉकडाउन आणि निर्बंधाना आता सामान्य नागरिक आणि व्यवसायिक हैराण झाले आहे. त्यामुळे निर्बंध शिथील होताच लोकांची रस्त्यावर गर्दी होते. गर्दी वाढली म्हणजे पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होते. हे दृष्टचक्र भेदण्यासाठी लसीकरण हाच पर्याय आहे. मात्र ७२ लाख ८८ हजार ९९० लोकसंख्येच्या नाशिक जिल्ह्यात लसीकरण सोपे नाही. रोज ४० हजार लसीकरणाचे डोस सातत्याने मिळणे गरजेचे आहे. पण सध्यांची महापालिका क्षेत्रातील एकेका केंद्रावर मिळणाऱ्या १०० डोसची संख्या बघता, लसीकरण खूप मोठे आव्हान आहे. त्यात, टोकन पध्दत सुरु करीत, महापालिकेने लसीकरण केंद्रावर सोय कमी गैरसोयच जास्त केली आहे.
लसीकरणाचा कृती आराखडा
- लोकसंख्या ४८१६२३७ (ग्रामीण) १९१०२३१ (नाशिक शहर) ५६२५२२ (मालेगाव) ७२८८९९०
- ४५ ते ५९ वर्षे कोम्बीड ३ टक्के १४४४८७ ५७३०७ १६८७६ २१८६७०
- ४५ ते ५९ वर्षे नॉन कोम्बींड ११०७७३५ ४३९३५३ १२९३८० १६७६४६८
- ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरीक ४५८९८७ १८२०४५ ५३६०८ ६९४६४१
- १८ ते ४४ लोकसंख्या २०२२८२० ८०२२९७ २३६२५९ ३०६१३७६
- आवश्यक लस (प्रत्येकी २ डोस) ७४६८०५८ २९६२००४ ८७२२४६ ११३०२३०८
- वाया जाणारे डोस ७४६८०६ २९६२०० ८७२२५ ११३०२३१
- प्रतिदिन लागणारे डोस ३०६०७ १२१३१ ३५७५ ४६३२१
प्रचार कार्यक्रम
लसीकरण हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. त्यात, प्रत्येकाला संधी आवश्यक आहे. मात्र आता टोकन पध्दतीच्या नावाने नवीन घुसखोरी सुरु झाली आहे. रांगेतील ठराविक नागरिकांना टोकन वाटायचे आणि त्यानंतर सोयीनुसार आपले लोक घुसवायचे असा फंडा सुरु झाला आहे. साडे नऊ ते साडे दहा अशी टोकन वाटायची वेळ असताना लोकांना टोकन मिळत नाही. त्यामुळे रोजच लस न घेता माघारी फिरावे लागते. असा अनुभव उपनगर केंद्रावरील नागरिकांनी सांगितला.
पहिली लाट दुसरी लाट संभाव्य तिसरी लाट
- भीतीदायक वातावरण सार्वजनिक भिती घटली बालकांवर परिणामाची शक्यता
- वैद्यकिय पूर्वतयारीची कमी गृह विलगीकरण, सर्वाधिक संसर्ग दर म्युकरमायकोसीसचा प्रादुर्भाव
- पूर्ण लॉकडाउन वैद्यकिय यंत्रणेची उभारणी लॉकडाउन विषयी नाराजीचा सूर
- मृत्युदर २.८ टक्के मृत्युदर २.१३ टक्के
- सर्वाधिक पॉझीटीव्ह २९४८ ६८२९ (१४ एप्रिल २१)
प्रतिबंधात्मक कारवाया
- विना मास्क ४५३६०
- दुकान १०१५
- विवाह, व्यायामशाळा ९१
- हॉटेल्स ८७५
- सिनेमागृह ४०
- धार्मिक स्थळ १८५
- सार्वजनिक जागा १३२७६
- एकूण कारवाया ६०८४२
- दंड वसूली १ कोटी ५३ लाख १४६१८
नाशिक १६ व्या स्थानी ( जिल्हा संसर्ग दर)
- सांगली ८.९ टक्के
- कोल्हापूर ८.६ टक्के
- सातारा ८.६ टक्के
- पुणे ८.२ टक्के
- रायगड ८.२ टक्के
- नाशिक २.४ टक्के
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.