नाशिक : जिल्ह्यात ग्रामीण भागातील १५ तालुक्यांतून ५३६ पाण्याचे नमुने तपासले असता यातील ५४ ग्रामपंचायतींनी पाणी नमुन्यात क्लोरिनचा २० टक्क्यांपेक्षा कमी वापर केल्याचे निदर्शनास आले आहे. क्लोरिनचा कमी वापर केल्याने हे पाणी पिण्यास अयोग्य ठरत असते. त्यामुळे पाणी शुद्धीकरण करण्याकडे या ग्रामपंचायतींनी दुर्लक्ष केल्याचे उघड झाले आहे. तपासणी केलेल्या दोन हजार ४७३ नमुन्यांपैकी ३७ जलस्रोतांचे पाणी दूषित आढळून आले आहे. (Neglect of water purification of 54 gram panchayats in district)