New Educational Policy : शैक्षणिक धोरणाला संस्‍थांच्‍या उपक्रमांतून बळ...!

Nashik News : काहीही झाले तरी यंदाच्‍या जूनपासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार असल्‍याची तंबी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाशिक दौऱ्यात दिलेली आहे
Educational
Educational esakal
Updated on

"काहीही झाले तरी यंदाच्‍या जूनपासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार असल्‍याची तंबी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाशिक दौऱ्यात दिलेली आहे. मात्र आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्‍या प्रभावी अंमलबजावणीसाठी सज्‍ज आहोत, असे विविध उपक्रमांतून नाशिकच्‍या शैक्षणिक संस्‍थांनीदेखील दाखवून दिलेले आहे. परिणामी यंदाच्‍या आठवड्यात घडलेल्‍या घडामोडींचे दूरगामी परिणाम जाणवणार असून, विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षणाची संधी उपलब्‍ध होण्यासाठी पायाभरणी झालेली आहे, असे म्‍हणता येईल." (New Educational Policy institutions marathi news)

शैक्षणिक वर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही महिने उरलेले असून, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी उच्च शिक्षण स्तरावरून सुरु होणार आहे. येत्‍या जूनपासून कुठल्‍याही परिस्थितीत धोरणाची अंमलबजावणी करावी लागणार असल्‍याचा सज्‍जड इशारा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेला आहे.

पण सकारात्‍मक बाब म्‍हणजे नाशिकमध्ये धोरणाचा स्‍वीकार करण्याच्‍या अनुषंगाने आधीच सर्व संस्‍था सकारात्‍मक आहेत. त्‍याअनुषंगाने शैक्षणिक संस्‍थांच्‍या पातळीवर बदल देखील घडविले जाता आहेत. याचाच एक भाग म्‍हणून मविप्र संस्‍थेतर्फे 'प्रज्ञा' या बौद्धिक संपदा केंद्राचा शुभारंभ करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्‍त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्‍या हस्‍ते या केंद्राचे उद्‌घाटन नुकतेच झाले.

शैक्षणिक धोरणात संशोधनाला महत्त्व दिलेले असून, त्‍यासाठी हे केंद्र आगामी काही वर्षांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल, यात शंका नाही. व भारतात मिळणाऱ्या पेटंटमध्ये नाशिकच्‍या या केंद्राचा लक्षणीय सहभाग असेल अशी अपेक्षा ठेवता येऊ शकते.

मविप्रतर्फे विद्यापीठ स्‍थापनेच्‍या घडामोडी यादेखील आगामी काळात नाशिकच्‍या शैक्षणिक विकासाच्‍या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. संस्‍थेतर्फे आयोजित आनंद शाळा या उपक्रमातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर व्‍यापक चर्चा घडविण्यात आली. (Latest Marathi News)

Educational
राजवंश भारती : काश्मीर राजवंश - राजतरंगिणी

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्‍युकेशन सोसायटीतर्फे पर्यटन संचालनालयाच्‍या सहकार्याने सुरु केलेले 'साहसी क्रीडा प्रशिक्षण केंद्र' याकडेही शैक्षणिक धोरणाच्‍या अनुषंगाने पहावे लागेल. अगदी गिर्यारोहणाच्‍या संधीपासून तर आपत्कालीन परिस्थितीत बचावात्‍मक उपाययोजना अशा विविध विषयांवरील हे प्रशिक्षण आगामी काळात महत्त्वाचे ठरेल. शैक्षणिक धोरणाशी हे शिक्षणक्रम जोडून घेतल्‍यास प्रशिक्षणातून क्रेडिट पॉईंट मिळविण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्‍ध होणार आहे.

लोकसभेनंतर प्राध्यापक भरती, विधानसभेपूर्वी अनुदानाची घोषणा

आगामी निवडणुकांमुळे शैक्षणिक क्षेत्रासाठी देखील लाभकारी ठरणार असल्‍याचे सूतोवाच झालेले आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संस्‍था चालकांसोबत झालेल्‍या बैठकीत विविध विषयांवर चर्चा केली. यात प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीनंतर प्राध्यापक भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्‍याचे सांगितले.

तर या वर्षाच्‍या उत्तरार्धात नियोजित विधानसभा निवडणुकांपूर्वी निकष पूर्ण करणाऱ्या महाविद्यालयांना शंभर अनुदान देण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्‍याचेही सांगितले. मतदार आकर्षित करण्यासाठीचा हा फंडा असला तरी यामुळे शैक्षणिक क्षेत्रावर दूरगामी व सकारात्‍मक परिणाम होणार आहेत.

Educational
सह्याद्रीचा माथा : आंतरधर्मीय गुन्हेगारीवर अंकुश आणणारे कर्णिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()