Nashik Industrial Highway: नाशिक पुणे दरम्यान नवीन औद्योगिक महामार्ग! रस्ते विकास महामंडळाच्या प्रस्तावास शासनाची मंजुरी

Nashik News : सुमारे वीस हजार कोटी रुपये खर्च असलेल्या या नवीन महामार्गामुळे नाशिक ते पुणे अंतर पाच तासाने ऐवजी केवळ दोन तासात पार करता येणार आहे.
Industrial Highway file photo
Industrial Highway file photoesakal
Updated on

वावी : राज्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सुमारे सव्वाचार हजार किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे जाळे विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गत नाशिक- पुणे औद्योगिक महामार्गास (Industrial Highway) शासनाने अंतिम मंजुरी दिली आहे.

सुमारे २० हजार कोटींचा खर्च असलेल्या नवीन महामार्गामुळे नाशिक ते पुणे अंतर पाच तासांऐवजी केवळ दोन तासांत पार करता येणार आहे. औद्योगिक महामार्गाची लांबी वाढविली आहे. त्यामुळे नाशिक ते पुण्यादरम्यानचे अंतर १८० वरून २१३ किलोमीटर एवढे वाढणार आहे.

नाशिक -पुणे औद्योगिक महामार्ग नाशिक, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळावी, यासाठी प्रस्तावित केला आहे. महामार्गाचा बृहत आराखडा तयार करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने जून २०२३ मध्ये मोनार्च सर्व्हेअर ॲन्ड इंजिनिअरिंग कन्सल्टंट कंपनीची नियुक्ती केली आहे.

कंपनी आराखडा तयार करीत असून, ‘एमएसआरडीसी’ने महामार्गाच्या संरेखनाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला होता. या प्रस्तावास राज्य सरकाने मंजुरी देत संरेखन अंतिम केले आहे. प्रकल्पास मान्यता देत प्रकल्प ‘एमएसआरडीसी’च्या माध्यमातून मार्गी लावण्यासही हिरवा कंदिल दिला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय गेल्याच आठवड्यात जारी झाला. (Latest Marathi News)

Industrial Highway file photo
Latest Marathi News Update: देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या

भोसली, शिर्डीला जाता येणार

पुणे-नाशिक औद्योगिक महामार्गाच्या २१३ किलोमीटर लांबीच्या अंतरात ३७ किलोमीटर लांबीचे चार जोड रस्ते असतील. भोसरी जोड रस्ता ३.६७१ किलोमीटर, रांजणगाव जोड रस्ता २३.६३०, राष्ट्रीय महामार्ग ६० जोड रस्ता ०.९२१ आणि शिर्डी जोड रस्ता ८.७९० किलोमीटरचा असेल.

जोडरस्त्यांमुळे पुणे अथवा नाशिकवरून भोसरी, शिर्डीला जाता येणार आहे. अंतिम संरेखनानुसार नाशिक पुणे औद्योगिक महामार्ग राजगुरूनगर, चाकण, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, घारगाव, संगमनेर आणि सिन्नर या भागातून जाणार आहे.

पुणे-शिर्डी साधारण लांबी १३५ किलोमीटर, शिर्डी इंटरचेंज ते नाशिक-निफाड इंटरचेंज (सुरत चेन्नई द्रुतगती महामार्गाचा भाग) साधारण लांबी ६० किलोमीटर व सुरत-चेन्नई द्रुतगती महामार्ग ते नाशिक (नाशिक-निफाड राज्य महार्गाचा भाग) साधारण लांबी १८ किलोमीटर, असा एकूण २१३ किलोमीटर लांबीचा हा महामार्ग असेल. महामार्गाचा आराखडा मंजूर झाल्याने भूसंपादन पूर्ण करत वर्षाअखेरीस वा नववर्षाच्या सुरवातील महामार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्याचे ‘एमएसआरडीसी’चे नियोजन आहे. (Latest Marathi News)

Industrial Highway file photo
HSC-SSC Exam Diet: परीक्षा काळात कसा असावा आहार? अभ्यासाच्या सततच्या बैठकीमुळे येतेय स्थूलता, ग्लानी; डॉक्टर काय सांगतात ?

शेतमालाची वाहतूक होणार जलद

नाशिक-पुणे औद्योगिक महामार्ग समृद्धी महामार्ग आणि सुरत ते चेन्नई एक्सप्रेस-वेला जोडला जाणार आहे. औद्योगिक, शेतीमाल अर्थात कार्गोची जलद वाहतूक होईल. सध्या पुणे, नाशिक किंवा नगरमधून शेतीमाल किंवा औद्योगिक माल मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदरात पाठविला जातो.

नव्या औद्योगिक कॉरिडॉरमुळे पुणे किंवा नगर येथील शेतीमालाची वाहतूक समृद्धीमार्गे करता येणे शक्य होणार आहे. महाराष्ट्र नव्हे, तर गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू व तेलंगणा या ठिकाणी मालवाहतूक करणे सुरत-चेन्नई एक्सप्रेस वेमुळे सोपे होणार आहे.

भविष्यात पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांमध्ये बंदर आणि दक्षिणेतील महत्त्वाच्या राज्यांसोबत भक्कम कनेक्टिव्हिटी मिळेल. याचा फायदा कृषी आणि औद्योगिक क्षेत्राला मोठ्या प्रमाणात होण्याच्या अपेक्षा आहेत.

Industrial Highway file photo
Cinema Lovers Day 2024: सिनेप्रेमींसाठी आनंदाची बातमी! 'या' दिवशी 99 रुपयात पाहा चित्रपट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.