Nashik News : नाशिकच्या 14 वर्षीय हृदयाची 250 km ची अश्‍वस्वारी!

Hridaya Prithviraj ande
Hridaya Prithviraj andeesakal
Updated on

सातपूर (जि. नाशिक) : नाशिकहून अडीचशे किलोमीटरची अश्‍वस्वारी करीत फक्त वय वर्षे १४ असलेल्या आदिवासी कन्या हृदया पृथ्वीराज अंडे ही सारंगखेडा येथील चेतक फेस्टिवलसाठी दाखल झाली. या ठिकाणी तिचे आयोजकांचे वतीने स्वागत करण्यात आले. (Nashik News 14 year old hridaya of Nashik rides horse for 250 km nashik news)

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

Hridaya Prithviraj ande
Nashik News : घोटी खुर्दच्या महिला सरपंच अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून अपात्र घोषित!

हृदया नाशिकहून १७ डिसेंबरला घोडा घेऊन निघाली. रस्त्यात ग्रामस्थांनी तिचे स्वागत केले. ते सारंगखेडा येथील चेतक फेस्टीवल येथे गेले गेली. या ठिकाणी तिचे आयोजकांनी जोरदार स्वागत तर व्यासपीठावर जिल्हा प्रशासनाच्यावतीने सत्कार करण्यात आला. तिच्या धाडसाचे यावेळी कौतुक करण्यात आले.

हृदयाने तिच्या या अश्‍वसारी संदर्भात सांगितले, की अश्वाची माहिती आजच्या युवकांना व्हावी, मुलींनीही पुढे येऊन अश्वभ्रमंती खेळ आणि स्पर्धा यामध्ये सहभागी होऊन पुढे यावे, तसेच अश्वाचा इतिहास प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. त्याचे महत्त्व शौकिनांना कळावे, अश्वासह चेतक महोत्सवाची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे हा मुख्य उद्देश होता, असे सांगितले.

तिच्या या प्रवासामुळे सर्वात लहान वयात अडीचशे किलोमीटर भ्रमंती करण्याचा विक्रम तिच्या नावावर नोंदला गेला आहे. दरम्यान, नाशिक शहरात आल्यावर कु. हृदया, तिचे वडील पृथ्वीराज अंडे यांची भेट घेऊन त्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संजय शिंदे युवराज सैंदाणे आणि गणेश राजकोर उपस्थित होते.

Hridaya Prithviraj ande
Performance Grading Index : ‘पीजीआय’मध्ये महाराष्ट्रात नाशिक पहिल्या स्थानावर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.