NMC News : थकीत 9 लाख रुपये भाडेवसुली; महापालिका पंचवटी विभागीय कार्यालयाकडून धडक कारवाई

NMC : महापालिका मालकीच्या व भाडे तत्त्वावर दिलेल्या गाळेधारकांकडे असलेली लाखो रुपयांची थकबाकी शुक्रवारी (ता.१) पंचवटी विभागीय कार्यालयाने धडक कारवाई करीत वसुल केली.
Municipal officials and employees accepting check of due amount at Manpa Gale in front of Mahalakshmi Talkies on Dindori Road.
Municipal officials and employees accepting check of due amount at Manpa Gale in front of Mahalakshmi Talkies on Dindori Road.esakal
Updated on

NMC News : पंचवटीतील हिरावाडी, ट्रक टर्मिनल व दिंडोरी रोडवरील महालक्ष्मी टॉकीजसमोरील बाजूस महापालिका मालकीच्या व भाडे तत्त्वावर दिलेल्या गाळेधारकांकडे असलेली लाखो रुपयांची थकबाकी शुक्रवारी (ता.१) पंचवटी विभागीय कार्यालयाने धडक कारवाई करीत वसुल केली. (nashik nmc news marathi news)

थकबाकीदारांना जाहिरात व परवाने विभागाकडून वारंवार नोटीस देऊनही भरणा होत नसल्याने अखेर महापालिकेचे सहायक आयुक्त मयूर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी विभागीय कार्यालयाने धडक वसुली मोहीम राबविली. यावेळी सुमारे नऊ लाख रुपये वसुली झाले.

महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयाचे विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता.१) सकाळी ११ वाजेच्या सुमारास गाळेधारकांकडून भाडे थकबाकी वसुली मोहीम राबविण्यात आली. (latest marathi news)

Municipal officials and employees accepting check of due amount at Manpa Gale in front of Mahalakshmi Talkies on Dindori Road.
NMC News : महापालिकेविरोधात अवमान याचिका; मनपाकडून झाडांचे बुंध्यांचे काँक्रिटीकरण

यावेळी थकबाकीदारांच्या ताब्यातील गाळे सील करण्याची कारवाई करण्यात येत होती. यात हिरावाडी येथील लाटे नगरातील गाळे धारकांकडून एक लाख रुपये, ट्रक टर्मिनल येथील गाळे धारकांकडून एक लाख रुपये तसेच दिंडोरी रोडवरील हॉटेल केद्राई व हॉटेल मोरया यांच्याकडील थकीत भाड्यापोटी सात लाख रुपये चेकच्या माध्यमातून वसूल करण्यात आले.

महापालिकेच्या मालकीचे गाळे भाड्याने घेणाऱ्यांनी थकबाकीदार होऊन गाळे सील होण्याची कारवाई टाळायची असल्यास वेळेत थकबाकी भरावी, असे आवाहन करण्यात आले. यावेळी निरिक्षक मंगेश वाघ, सहायक अधिक्षक भूषण देशमुख, प्रकाश उखाडे, राहुल बोटे, संजय बोरसे, अविनाश बोरसे, संतोष खांदवे आदी कर्मचाऱ्यांसह पोलिस उपस्थित होते.

अवैध मोटार जोडणी आली समोर

हॉटेल केद्राईच्या चालकाने पाळी नळ जोडणीला थेट मोटार जोडल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी हॉटेल चालकाला तत्काळ ती मोटार काढून घेण्यास सांगितले. तसेच दंडात्मक कारवाईचा इशारा देत पाणीपट्टीचेही थकीत असलेले पंचावन्न हजार रुपयांची वसूल केले.

Municipal officials and employees accepting check of due amount at Manpa Gale in front of Mahalakshmi Talkies on Dindori Road.
NMC News : मनपाच्या 62 वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.