Students Innovation : विद्यार्थ्यांनी बनवली ‘ब्लाईंड स्टिक’; दीड फुटांवरच कळणार अडथळा

Students Innovation
Students Innovation esakal
Updated on

इगतपुरी : ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहीजे’ असे भगवान श्रीकृष्णाने भगवद्‌ गीतेत अर्जुनाला सांगितले आहे. काम करीत जा, हाक मारीत जा असा जगाच्या कल्याणासाठी उपदेशही केला आहे.

याचाच प्रत्यय इगतपुरीत आला आहे. येथील महात्मा गांधी हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकणाऱ्या १३ विद्यार्थ्यांनी दिव्यांग बांधवांना उपयुक्त ठरेल अशी एक ब्लाइंड स्टिक बनवली आहे.

Students Innovation
Student Scholarship : विद्यार्थी शिष्यवृत्ती अद्यापही प्रलंबित; NSUI आयुक्तांना निवेदन

या काठीमुळे दिव्यांग बांधवांना दीड फुटांवर काही अडथळा आल्यास त्याची पूर्वसूचना मिळणार आहे. आय. ओ. टी. (Internet of things) हा अभ्यासक्रम करत असताना मार्गदर्शक शिक्षिका अनिषा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्याना प्रश्‍न विचारला, की तुम्ही विशेष असे काय करू शकता?

त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनात आले की आपण दिव्यांग बांधवांसाठी अशी काठी बनवूया, जेणेकरून ते चालत असताना समोर काही अडथळा आल्यास त्यांना लगेच कळेल व ते आपला मार्ग सुरक्षितपणे बदलतील. या भावनेने हे विद्यार्थी लगेच काठी बनविण्यासाठी कामाला लागले व अवघ्या एक दिवसांत त्यांनी या काठीची निर्मिती केली.

Students Innovation
Student Honor : राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचा गौरव होणार

ही काठी बनवण्यासाठी विद्यार्थ्यांनी पाईप, अल्ट्रा सोनिक सेन्सर, बझर, मायक्रो कंट्रोलर, आर. डी. नो उनो बोर्ड, ९ वॉल्टची बॅटरी आदी साहित्याचा वापर केला. त्यांना मुख्याध्यापक अनिल पवार, उपमुख्याध्यापक उमाकांत वाकलकर, पर्यवेक्षक लक्ष्मीकांत ठाकरे, शिक्षिका अनिशा कुलकर्णी, शिक्षक अविनाश कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. मुलांनी बनविलेल्या या काठीमुळे सर्वस्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

नवीन शैक्षणिक धोरणानुार इयत्ता ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना इंटरनेट ऑफ थिंग्स हा कोर्स शिकवला जात आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवीन संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याची संधी व प्रेरणा मिळत आहे. हे विद्यार्थी लवकरच स्मार्ट डस्टबिन, स्मार्ट कार, स्मार्ट संगणक बनवणार असून, त्या दृष्टीने त्यांची कार्यशाळा सुरू आहे.

Students Innovation
Nashik News : पदवीधर डी. एड शिक्षकांच्या सेवाजेष्ठता लढ्याला यश; प्रवर्ग 'क' मध्ये समावेश

या विद्यार्थ्यांचा सहभाग

या प्रकल्पात हृदय बागल, प्रितेश भागडे, निखिल चव्हाण, जगदीश राक्षे, अनिल चौधरी, सुनील चौधरी, हर्षद भागडे, रोहित गांगुर्डे, जय शिंदे, अंकुश मोरे, सार्थक मुळीक, जयेश भागडे, वैभव पाटील या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.