Chhagan Bhujbal : "OBC समाजात मोठी अशांतता पसरेल, मग नेत्यांचीसुद्धा गरज भासणार नाही", भुजबळांचा दावा

Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाबाबत शुक्रे समितीने शासनाला अहवाल सादर केला. त्या पार्श्‍वभूमीवर भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal esakal
Updated on

Chhagan Bhujbal : मराठा समाज आजही राज्यकर्ता असल्याने सामाजिकदृष्ट्या मागास कसा होईल? असा सवाल करताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही. परंतु शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या मागास आहे का, ते तपासावे लागेल. मराठा समाज मागास झाला तर तो ओबीसीमध्ये येईल. ( nashik news chhagan Bhujbal statement )

त्यामुळे ओबीसी समाजात मोठी अशांतता पसरेल, मग नेत्यांचीसुद्धा गरज भासणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. मराठा आरक्षणाबाबत शुक्रे समितीने शासनाला अहवाल सादर केला. त्या पार्श्‍वभूमीवर भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यास विरोध नाही. किंबहुना पाठिंबाच आहे.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ राज्यसभेवर जाण्यासाठी उत्सुक

मात्र खऱ्या अर्थाने ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशा प्रकारचे आरक्षण मराठा समाजाला द्यायला हवे. शुक्रे समितीने पंधरा दिवसांत अतिशय विक्रमी वेळेत दीड कोटी नागरिकांचे सर्वेक्षण केल्यानंतर शासनाला अहवाल सादर केला. ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. जर इतक्या कमी वेळात सर्वेक्षण होणार असेल, तर अजून थोडा वेळ वाढवून जातीनिहाय जनगणनेचे सर्वेक्षणदेखील पूर्ण करून घेण्याचा सल्ला त्यांनी दिला.

शासनाने नेमलेल्या मागासवर्ग आयोगातील सदस्य कमी होत गेले. पुढे न्यायमूर्ती मेश्राम यांनादेखील समितीतून शासनाने काढले. याबाबत समाजात चर्चा आहे. आता ओबीसीमध्ये १७ टक्क्यांत ३७० हून अधिक जाती असताना खोट्या नोंदी करून कुणबी दाखले दिले जात आहेत. सरकारने हे कुणबीकरण थांबविले पाहिजे. तसेच ओबीसी समाजात आलेल्या सर्व कुणबीना स्वतंत्र मराठा आरक्षण देण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : द्वारका सर्कल येथे मुंबई नाक्याप्रमाणे सिग्नल यंत्रणा : मंत्री छगन भुजबळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.