नाशिक : अवकाळी पावसामुळे निफाड व येवला तालुक्यांतील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जावरील व्याज माफ करावे, तसेच पीकविम्याची भरपाई त्वरित मिळावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या येवला विधानसभाप्रमुख तथा पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका अमृता पवार यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे. (Nashik News forgive interest on farmers loans Amrita Pawars letter to Agriculture Minister)
जिल्ह्यातील ३४ हजार हेक्टरला अवकाळीचा तडाखा बसला. द्राक्ष, कांदा, मका व भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याविषयी अमृता पवार यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या वेळी शंकर वाघ, समीर समदडिया, उत्तमराव कातकाडे उपस्थित होते.
जिल्ह्यात अगोदरच दुष्काळ आहे. चाऱ्याची टंचाई असताना शेतकऱ्यांनी चाऱ्याची व्यवस्था केली. अवकाळी पावसाने तोही नष्ट केला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत शासनाने तातडीने मदत करण्याचे आवाहन अमृता पवार यांनी केले आहे.
तसेच, शेतकऱ्यांनी सन २०२२-२३ या वर्षात बँकेकडून घेतलेल्या पीक कर्जावरील व्याज माफ करावे, सक्तीची कर्जवसुली थांबवावी, वीजतोडणी करून व शेतकऱ्यांना पीकविमा कंपनीमार्फत आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.