Nashik News : शहर पोलिस आयुक्तालय हद्दीतून एमडी (मेफेड्रॉन) ड्रग्जसह अमलीपदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आयुक्त संदीप कर्णिक कठोर झाले असून, ‘टीप’ द्या, संशयितांविरुद्ध धडक कारवाई करण्याचे आवाहनच सोशल मीडियावरून आयुक्तांनी केले आहे. दरम्यान, आयुक्तांच्या व्हॉटसॲप क्रमांकावर आलेल्या माहितीवरून पोलिसांनी गेल्या आठवड्यात एमडी ड्रग्ज पेडलरला जेरबंद केले आहे. ( Give tip of drugs take action against suspects Police Commissioner Sandeep Karnik appeal)
गेल्या सहा महिन्यांपासून नाशिक एमडी ड्रग्ज प्रकरण राज्यातच नव्हे तर देशभरात गाजते आहे. कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्जसह कारखाने उद्ध्वस्त केले आहेत. तर, नाशिक गुन्हे शाखेने सोलापुरात जाऊन एमडी ड्रग्जचे दोन कारखाने उद्ध्वस्त करीत टोळी जेरबंद केली आहे.
असे असतानाही शहरात लपूनछपून एमडी ड्रग्जची विक्री सुरू आहे. आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिककरांना तक्रारी करण्यासाठी व्हॉटसॲप क्रमांक ९९२३३२३३११ सुरू केला आहे. यावर आत्तापर्यंत १३८० तक्रारी आलेल्या आहेत. यामध्ये दोन तक्रारी या एमडी ड्रग्जसंदर्भात होत्या.
त्यावरून शहर गुन्हे शाखेने अंबडच्या चुंचाळे परिसरात आणि आडगाव शिवारात कारवाई करीत ड्रग्ज पेडलरच्या मुसक्या आवळल्या होत्या. पोलिस आयुक्तांनी व्हॉटसॲप क्रमांकावर अमलीपदार्थांसंदर्भात शहरात चोरीछुपे सुरू असलेल्या कारवायांची माहिती पोलिसांनी कळवावी, अन्यथा पोलिस आयुक्तांच्या व्हॉटसॲप क्रमांकावर द्यावी, असे आवाहन केले आहे. अवैध धंद्यांविषयीचीही माहिती दिल्यास धडक कारवाई केली जाईल, असेही म्हटले आहे.
"शहरात कुठेही अमलीपदार्थांची विक्री होत असेल तर त्याची माहिती संबंधितांनी पोलिसांच्या व्हॉटसॲप क्रमांक ९९२३३२३३११ यावर कळवावी. पोलिसांकडून तत्काळ कारवाई केली जाईल." - संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.