Gurumauli Annasaheb More : संसार सुखाचा व्हावा : गुरुमाउली मोरे

Gurumauli Annasaheb More : सर्व संतांनी भवरोगावर खात्रीचे औषध सांगितले आहे. संसार दुःखाचा असून, तो सुखाचा आहे असे वाटते, हा आमचा मुख्य रोग आहे.
Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb Moreesakal
Updated on

Gurumauli Annasaheb More : सर्व संतांनी भवरोगावर खात्रीचे औषध सांगितले आहे. संसार दुःखाचा असून, तो सुखाचा आहे असे वाटते, हा आमचा मुख्य रोग आहे. रोग असेल तसे औषध घ्यावे लागते. अजीर्णाने पोट दुखते, ते भुकेने दुखते असे वाटून आम्ही अधिक खाऊ लागलो तर कसे चालेल? संसार ज्याला दुःखाचा वाटतो त्यालाच परमार्थाचा उपयोग होतो, असे गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी रविवारी सांगितले. ()

दिंडोरी प्रधान श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात सेवेकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. या वेळी आबासाहेब मोरे हे उपस्थित होते. गुरुमाउली आण्णासाहेब मोरे म्हणाले, की व्यसनाचा अंमल नसतो त्या वेळी तो शुद्धीवर येतो. त्याला आपल्या बायको-मुलांची काळजी वाटते; पण त्याच्या बुद्धीला त्यातून मार्ग सुचत नाही.

मग तो पुनः व्यसन करतो. त्यात त्याला सर्वांचा विसर पडतो आणि त्यातच तो स्वतःचा नाश करून घेतो. याचप्रमाणे प्रापंचिक माणसाची स्थिती होते. मनुष्य प्रपंचात रमतो. काही दिवसांनंतर तो थकतो, त्याची उमेद कमी होते.

आता आपल्या हातून परमार्थ कसे होणार, असे त्याला वाटते आणि शेवटी हीन अवस्थेत मृत्यू पावतो. जो जगाचा घात करतो तो एका दृष्टीने बरा, कारण जग त्याला सांभाळून घेईल. पण जो स्वतःचा घात करून घेतो तो फार वाईट समजावा. कारण त्याला कोण सांभाळणार? केवळ प्रापंचिक मनुष्य असा आत्मघातकी असतो.

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More : सर्वांगीण विकासासाठी गावे दत्तक घ्या : गुरुमाउली

देवाने जे निर्माण केले ते माझ्या सुखाकरिताच केले, असे समजून मृत्यूपर्यंत त्यातच गुरफटून जातो. मनुष्य तेच तेच करीत असूनसुद्धा त्याला त्याचा कंटाळा येत नाही. तेच ते जेवण, ती नोकरी, तोच तो पैसा मिळवणे.

कंटाळा न येण्याचे कारण एकतर विषय अत्यंत गोड तरी असला पाहिजे किंवा हावेला तृप्ती तरी नसली पाहिजे. विषयामध्ये सुख आहे ही आपण कल्पना केली, त्याचा अनुभव अनेकदा घेतला, तरी आपली कल्पना खरी की खोटी, हे आपल्याला कळत नाही हे मात्र विशेष आहे, असे गुरुमाउली म्हणाले.

सुरवातीस पूजन व महाआरती झाली. त्यानंतर हितगूज होऊन उपस्थित सेवेकऱ्यांच्या शंकांचे निरसन गुरुमाउली यांनी केले. पालखी सोहळआ, जप होऊन महाप्रसादाचे सेवकऱ्यांना वाटप करण्यात आले. या वेळी राज्यभरातून आलेले सेवेकरी व भाविक बहुसंख्येने उपस्थित होते.

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More : वितुष्ट आणायला कारण पैसाच : गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.