निखिल रोकडे: सकाळ वृत्तसेवा
Nashik News : ‘कराओके’ क्लबच्या माध्यमातून अनेक हौशी गायकांना कला सादर करण्यासाठी व छंद जोपासण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळालेले आहे. दिवसेंदिवस नाशिकमध्ये वाढणाऱ्या ‘कराओके’ क्लबमुळे जवळपास दोन हजार पाचशेहून अधिक हौशी गायक कला सादर करत आहे. आजमितीस नाशिकमध्ये साठ कराओके क्लब आहेत. ()
दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत सर्वजण ताणतणावाचे त्रस्त आहे. संगीत व गायन हा असा छंद आहे की यामुळे आपला मानसिक तणाव कमी करण्यास मदत होते. आपल्या जीवनात आनंद व समाधान निर्माण होते.
लग्न असो या समारंभ, वाढदिवस असो या कोणत्याही प्रकारचे गेट-टुगेदर यामध्येही मनोरंजनासाठी ‘कराओके’ची सध्या चलती आहे. कराओके क्लब स्वतःचा निर्माण करायचा असेल तर चाळीस हजारांपासून ते अडीच लाखापर्यंत खर्च येतो. अगदी तीन-चार हौशी कलावंत मिळून जरी सुरू केला तरी प्रत्येकाच्या वाट्याला कमी गुंतवणूक येते.
जे स्वतः कराओके क्लब सुरू करू शकत नाही ते त्या क्लबचे सभासद होतात. सर्वसाधारणपणे गाणं शिकण्यासाठी व सादर करण्यासाठी प्रतिमाह पाचशे रुपये ते एक हजार शुल्क आकारले जाते. त्यामुळे हौशी कलावंत त्यासाठी सहज क्लबचे सभासद होतात. बदलत्या तंत्रानुसार प्रत्येक क्षेत्राचे ट्रेंड बदलत आहे. यात याला अपवाद गायन क्षेत्रही राहिलेले नाही.
अनेकांना आत्मविश्वास
ज्याला थोडे फार गाण्याचं ज्ञान व गायकी आहे किंवा ज्याला गाणे शिकण्याची इच्छा आहे ते सुद्धा काही दिवसातच चांगलं गाणं म्हणू शकतात. कराओके क्लबमुळे शक्य झाले आहे. पूर्वी गाणे फक्त ऐकण्यापुरते किंवा ऑर्केस्ट्रा मध्ये प्रोफेशनल सिंगर, टीव्ही रेडिओ वर आपण गाणं ऐकायचो मात्र कराओके ट्रॅकवर अतिशय सहज पद्धतीने हुबेहूब तशीच गाणी थोडाफार रियाज केला तरी आपण म्हणू शकतो, असा आत्मविश्वास अनेक गायकांना आलेला आहे. मोबाईलवरही या गाणे कराओके ट्रॅक स्टारमेकर ॲप हेही अत्यंत लोकप्रिय आहे.
सुप्त गुणांना व्यासपीठ
कराओके क्लबमध्ये सहभागी होणाऱ्यांमध्ये अगदी लहान वयाच्या मुलापासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अशा सर्व वयोगटातील स्त्री- पुरुष जोडलेले आहे. अगदी सर्वसाधारण व्यक्तीपासून ते प्रतिष्ठित मोठमोठे उद्योजक व व्यावसायिक आपल्या पद व प्रतिष्ठेची तमा न बाळगता आपला छंद जसा वेळ मिळेल तसे सर्वांबरोबर जोपासत आहे.
तंत्रज्ञान जसे अद्ययावत होत जाते तसतसे पूर्वीचे साधने मागे पडतात. यामुळे पूर्वीच्या संगीत क्षेत्रात काम करणारे ही आता कराओके क्लबकडे एक व्यावसायिक दृष्टिकोन म्हणून बघत आहे. कराओके माध्यमातून अनेक जणांना अनेकांमध्ये सुप्त गुण समोर आले आहे.
''कलेचे स्वरूप काळानुसार बदलत आहे, त्यानुसार आपणही बदलले पाहिजे. ‘कराओके’ माध्यमातून सर्वांना गाण्याची संधी सहज आहे. यामुळे गायकांना एक हक्काचे व्यासपीठ मिळाली आहे. कलेला बंधन नसते, आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर आपल्या कला जोपासून आपण यशस्वी होऊ शकतो.''- मदन केदारे, मेरी आवाज मेरी पहचान कराओके क्लब, जेल रोड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.