Nashik Gangapur Dam : गंगापूर धरणात खोदणार चर; 18 दिवसांच्या पाण्याची तूट भरण्यासाठी सर्वेक्षण

Gangapur Dam : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात १२ जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे.
Nashik Gangapur Dam
Nashik Gangapur Damesakal
Updated on

Nashik Gangapur Dam : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात १२ जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे अठरा दिवसांची पाण्याची तूट भरून काढणे गरजेचे असल्याने महापालिकेने इंटेकवेलपर्यंत चर खोदण्यासाठी सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शहराला मुख्यत्वे गंगापूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. (nashik news Municipal Corporation has conduct survey marathi news )

यंदा गंगापूर धरणात १५ ऑक्टोंबर २०२३ ते ३१ जुलै २०२४ या कालावधीसाठी ४४०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्याची मागणी करण्यात आली होती. त्याचबरोबर मुकणे धरणातून १६०० तर दारणा धरणातून १०० असे एकूण ६१०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्याची मागणी नोंदविण्यात आली.

मात्र छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडावे लागणार असल्याने आरक्षणात कपात करण्यात आली. ५३१४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले. शहराला दररोज वीस दशलक्ष घनफूट पाण्याचा पुरवठा होतो. त्या अनुषंगाने विचार करता अठरा दिवस पाण्याचा शॉर्टफॉल दिसून येतो.

Nashik Gangapur Dam
Gangapur News : गोरक्षक दलाच्या उपोषणाला यश : समर्थनार्थ व्यापारी बाजारपेठ कडकडीत बंद

पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली पाणीटंचाई संदर्भात शुक्रवारी (ता.२३) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यात धरणनिहाय आढावा घेण्यात आला. यावेळीही पाण्याच्या शॉर्टफॉल संदर्भात माहिती देण्यात आली.

..तर पाणीटंचाई मिटणार

गंगापूर धरणात ६०० दशलक्ष मृत पाणीसाठा आहे. तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्यास धरणाच्या मध्यभागी असलेला हा मृत पाणीसाठा इंटेकवेलपर्यंत आणण्यासाठी चर खोदावी लागणार आहे. धरणाला धोका होऊ नये म्हणून चर खोदण्यासाठी सर्वेक्षण करणे गरजेचे आहे.

त्यासाठी महापालिकेकडून शुक्रवारी (ता.२३) निविदा प्रसिद्ध करण्यात आली. चर खोदल्यानंतर मृत पाणीसाठा इंटेकवेलपर्यंत येऊन पाणी टंचाईचा प्रश्न पावसाळ्यापर्यंत मिटणार आहे. (latest marathi news)

Nashik Gangapur Dam
Nashik Gangapur Dam : गंगापूर धरणाच्या पाण्याचा रंग बदलतोय; पर्यावरणप्रेमींना दूषित पाण्याचा संशय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.