SAKAL Special : चालता... बोलता...! गोष्ट एका ॲपची

SAKAL Special : नाशिकमध्ये कॅनडा कार्नर परिसरातील एका शाळेमध्ये रविवारी वक्तृत्व स्पर्धा होती. या स्पर्धेसाठी शहर-परिसरातील विद्यार्थ्यांना खुला प्रवेश दिला होता.
social media
social mediaesakal
Updated on

गोष्ट एका ॲपची

नाशिकमध्ये कॅनडा कार्नर परिसरातील एका शाळेमध्ये रविवारी वक्तृत्व स्पर्धा होती. या स्पर्धेसाठी शहर-परिसरातील विद्यार्थ्यांना खुला प्रवेश दिला होता. त्यामुळे वक्तृत्वाची आवड असलेले विद्यार्थी पालकांसह उपस्थित होते. परंतु स्पर्धेच्या ठिकाणी चांगलाच सावळागोंधळ होता.

स्पर्धेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती तसेच विद्यार्थ्यांसमवेत येणाऱ्या पालकांना त्यांच्या स्मार्ट मोबाईलमध्ये एका राजकीय पक्षाशी संबंधित असलेले ॲप डाऊनलोड करण्यास बंधनकारक करण्यात आले होते. त्याबाबत काही पालकांनी आक्षेपही घेतला.

परंतु एका राजकीय पक्षाचे ॲप डाऊनलोड करून त्यावर माहिती भरल्यानंतरच विद्यार्थ्यांस वक्तृत्व स्पर्धेसाठीचा प्रवेश निश्चित केला जात होता. त्यावरून काही पालकांनी संयोजकांशी वादही घातला परंतु संबंधित त्यांच्या निर्णयावर ठाम राहिल्याने काहींनी स्पर्धेतून आपल्या पाल्यासह काढता पाय घेतला.

व्यथा बदलीची...

शासकीय अधिकारी होण्यासारखे दिवस आता राहिले नाहीत, असे काही अधिकारी खासगीत बोलताना सांगतात. त्याची कारणे विचारली तर फार हसण्यासारखी कारणे ते सांगतात. नोकरीला लागल्यानंतर आपण हे करू, ते करू असे मनाशी ठरवलेले असते. पण प्रत्यक्षात खुर्चीत बसल्यावर होते भलतेच.

जी कामे नको करायला, तीच कामे अगोदर करावी लागतात. बरे एवढे करुनही आपल्या बदलीची वेळ आली, की पुढारी बिनकामाचे फिरवतात. तेव्हा वाटते नको बाबा ही नोकरी. आता बदल्याचे वारे वाहत असल्याने एका बदली पात्र अधिकाऱ्याची ही व्यथा कुणी ऐकूण घेईल का सांगा बरे.

social media
SAKAL Special : चालता... बोलता...! साहेब इतका उशीर...

कार्यक्रमाला प्रेक्षकच मिळेना...

कोणत्याही लेखकासाठी त्याने लिहिलेले पुस्तक त्याच्यासाठी मुलाप्रमाणेच असते. अशाच एका लेखकाचा पुस्तक प्रकाशनाचा सोहळा रविवारी झाला. मोठ्या हॉलमध्ये जेमतेम दहा-पंधरा डोकी कार्यक्रमाला उपस्थित होती.

त्यात नक्की कार्यक्रम आहे की नाही, असे वातावरण असताना शेवटी सूत्रसंचालक जागेवरून उठले आणि अमुक पाहुणे आले, तमुक पाहुणे आले, याचे स्वागत करतो, त्याचे स्वागत करतो, असे सांगू लागला.

आता थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होईल... पण थोडा वेळ काही होईना आणि कार्यक्रमही काही सुरू होईना. शेवटी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि लेखकाच्या घरची मंडळी, नातेवाईक मात्र तेवढी उरली. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीतच कार्यक्रम पार पडला.

social media
SAKAL Special : चालता... बोलता...! साहेब इतका उशीर...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.