Scholarship Exam : नाशिक जिल्ह्यातून 53 हजार 397 विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा; 18 फेब्रुवारीला होणार परीक्षा

Scholarship Exam : इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा परिषदेतर्फे शिष्यवृत्ती परीक्षेचे दर वर्षी आयोजन करण्यात येते. यंदा ही परीक्षा १८ फेब्रुवारीला होत आहे.
Scholarship Exam
Scholarship Exam esakal
Updated on

Scholarship Exam : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( Scholarship Exam ) आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी (ता.१८ ) फेब्रुवारीला होणार असून, नाशिक जिल्ह्यातून इयत्ता पाचवीसाठी २८ हजार ८१६, तर इयत्ता आठवीसाठी २४ हजार ५८१, असे एकूण ५३ हजार ३९७ विद्यार्थी शिष्यवृत्तीची परीक्षा देणार आहेत. (Scholarship Exam )

इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा परिषदेतर्फे शिष्यवृत्ती परीक्षेचे दर वर्षी आयोजन करण्यात येते. यंदा ही परीक्षा १८ फेब्रुवारीला होत आहे. या परीक्षेसाठी राज्यातील आठ लाख ९१ हजार ७०० विद्यार्थ्यांनी त्यासाठी अर्ज केले आहेत. नाशिक जिल्ह्यातील ३६६ केंद्रांसह राज्यातील सहा हजार १८३ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे, अशी माहिती प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव व परीक्षा नियंत्रक तथा उपशिक्षणाधिकारी संतोष झोले यांनी दिली.

इगतपुरी तालुक्यातून या परीक्षेसाठी इयत्ता पाचवीसाठी एक हजार ३९३, तर आठवीसाठी एक हजार ७९ विद्यार्थी प्रविष्ट असून, एकूण ३३ केंद्रांवर ही परीक्षा घेतली न्याणार असल्याची माहिती शिक्षण विस्ताराधिकारी शिवाजी आहिरे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य परीक्षेच्या माध्यमातून दर वर्षी पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाते. त्यात प्रत्येकी १५० गुणांचे दोन पेपर असतात.

Scholarship Exam
Scholarship Exam Result : पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर, एका क्लिकमध्ये पहा रिझल्ट

चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सर्वच विद्यार्थ्यांना (पाचवी व आठवीतील) परीक्षेला बसविता येते. नाशिक जिल्ह्यातील पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी १९८, तर आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी १६८ परीक्षा केंद्रे असणार आहेत. १८ फेब्रुवारीला सकाळी अकराला पहिला पेपर सुरू होईल. दुसरा पेपर दुपारी दोन ते साडेतीन, या वेळेत होईल.

परीक्षेच्या प्रश्नपत्रिका जिल्ह्याच्या ठिकाणी दाखल झाल्या आहेत. राज्यातील ७७ हजार ७४० शाळांमधील इयत्ता पाचवीचे पाच लाख दहा हजार ३७८, तर आठवीच्या २४ हजार ५०४ शाळांमधील तीन लाख ८१ हजार ३२२ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. आपल्या शाळांमधील सर्वाधिक विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र व्हावेत, या हेतूने अनेक शाळांनी स्वतंत्र शिकवणी घेतल्याचीही उदाहरणे आहेत.

दोन वर्षे मिळते दरमहा शिष्यवृत्ती

परीक्षेच्या माध्यमातून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्याला दरमहा पाचशे रुपये, तर आठवीच्या विद्यार्थ्यास दरमहा साडेसातशे रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र २३ जुलै २०२३ मध्ये शालेय शिक्षण विभागाने ही रक्कम वाढविली आहे. वर्षातील दहा महिने ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळते.

Scholarship Exam
Scholarship Exam : शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारीला ; पाचवीला २१,५४० तर आठवीसाठी १८ हजार ४६१ विद्यार्थी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.