Nashik News : शहाजी उमप नाशिक ग्रामीणचे नवे पोलीस अधीक्षक

Nashik Police news
Nashik Police newsesakal
Updated on

नाशिक : नाशिक ग्रामीणचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक म्हणून शहाजी उमाप यांनी पदभार शुक्रवारी (ता.२१) सायंकाळी स्वीकारला. सचिन पाटील यांची औरंगाबाद येथे गुन्हे अन्वेषण विभागाचे अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. तर, केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरणाच्या (कॅट) आदेशान्वये उमाप यांनी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी स्वीकारली आहे.

Nashik Police news
Nashik : District SP सचिन पाटील यांची अखेर बदली; DCP बारकुंड धुळ्याचे SP

गृहविभागाने राज्यातील २४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या तर, १९ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना त्यांची पदस्थापना करण्यात आलेली नाही. या बदल्यांमध्ये नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची गुरुवारी (ता.२०) औरंगाबाद येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) अधीक्षक म्हणून बदली केली आहे. पाटील यांच्या बदलीसंदर्भात गेल्या महिन्याभरापासून चर्चा होती. अपेक्षेप्रमाणे त्यांची बदली होऊन त्यांच्या रिक्त जागी मुंबईती व्हीआयपी सुरक्षा विभागाचे उपायुक्त शहाजी उमाप यांनी शुक्रवारी (ता.२१) सायंकाळी पदभार स्वीकारला आहे.

गेल्या वर्षी ९ सप्टेंबर २०२१ रोजीच्या गृहविभागाच्या आदेशान्वये अधीक्षक सचिन पाटील यांची मुंबई येथे राज्यगुप्ता वार्ता विभागाचे अधीक्षक म्हणून बदली झाली होती. तर उमाप यांची नाशिक ग्रामीणचे अधीक्षकपदी नियुक्ती केली होती. कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली केल्याच्या विरोधात पाटील यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती. त्यामुळे त्यांच्या बदलीला मॅटने स्थगिती दिली होती. या स्थगितीबाबत मॅटने गेल्या महिन्यात निकाल देताना स्थगिती उठविली होती, आणि शासनाला पाटील यांच्या बदलीचे आदेश देताना उमाप यांची नियुक्ती महिनाभरात करण्याचे आदेश दिले होते. त्याच आदेशानुसार, उमाप यांनी शुक्रवारी (ता.२१) आडगाव पोलीस मुख्यालयात हजर होत नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

Nashik Police news
Nashik Crime News : ट्रायलच्या नावाखाली Activa केली लंपास

तात्काळ कार्यमुक्तचे आदेश

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांनी नाशिक ग्रामीणसह जळगाव, धुळे, अहमदनगर पोलीस अधीक्षकांना आपला पदभार शुक्रवारीच (ता.२१) कार्यमुक्त होत बदलीच्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्याचे आदेश बजावले आहेत. जळगावचे अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अहमदनगरचे अधीक्षक मनोज पाटील यांनी अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, तर धुळयाचे अधीक्षक प्रवीण पाटील यांनी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्याकडे सोपवून कार्यमुक्त होण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.