Shiv Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराज जयंती ( shiv jayanti 2024 ) उत्साहात साजरी करण्यासाठी शहरात जय्यत तयारी सुरू आहे. झेंडे अन् पताकांमुळे अवघे शहर भगवेमय झाले आहे. शिवजयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणूक मार्गांवरही भगव्या झेंडे लावले जात आहेत. तसेच, जयंती उत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी मिरवणूक मार्गावर सीसीटीव्हीद्वारे करडी नजर ठेवली जाणार आहे. (City saffron with flags flags for shiv jayanti )
शिवजयंतीनिमित्त सोमवारी (ता.१९) शहरात भव्य अशी मिरवणूक निघणार आहे. शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासाठी मंडळांकडून जय्यत तयारी सुरू आहे. विशेषत: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून भव्यदिव्य असे देखावे उभारले जात आहेत.
चौका-चौकातील रस्ते भगवेमय करण्यासाठी मंडळांमध्येच जणू स्पर्धा लागली आहे. उपनगरी चौकांमध्ये मंडप उभारले जात आहेत. भद्रकाली, सरकारवाडा आणि पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून शिवजयंती मिरवणूक मार्गस्थ होणार असल्याने त्यात या तीनही पोलिस ठाण्यांचे प्रमुख अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचाऱ्यांची मिरवणुकीवर बारकाईने नजर असणार आहे.
दरम्यान, शिवजयंतीनिमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मिरवणूक शांततेच्या वातावरणात काढावी, मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे.
शहरातील मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, शिवजयंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणूक मार्ग भगवे झेंडे आणि पताकांनी सजविण्यात आले आहेत.
त्याचप्रमाणे ठिकठिकाणी मिरवणुकीत सहभागी मंडळांचे स्वागत करण्यासाठी मंच उभारण्यात आलेले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना, मित्रमंडळांकडून ठिकठिकाणी राजकीय नेत्यांकडून फलकबाजीही केली जात आहे.
अशोकस्तंभ जाम
अशोकस्तंभावर भव्यदिव्य अशा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृतींचा देखावा उभारण्याचे काम शनिवारी (ता. १७) सुरू होते. त्यासाठी भव्य क्रेन आणण्यात आली होती. परंतु त्याचा परिणाम चौकातील रहदारीवर होऊन दिवसभर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. अशोकस्तंभापासून ते जिल्हा न्यायालयापर्यंत, गंगापूर रोडवर अशोकस्तंभ ते पोलिस आयुक्तालयापर्यंत वाहनांचा लांबच्या लांब रांगा लागलेल्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.