Shiv Jayanti 2024 : मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण हटविले

Shiv Jayanti 2024 : शिवजयंतीनिमित्त महापालिका पूर्व आणि पश्चिम विभागाकडून मिरवणूक मार्गावर संयुक्त मोहीम राबविण्यात आली.
Employees of Municipal Encroachment Removal Team removing encroachments from the procession route.
Employees of Municipal Encroachment Removal Team removing encroachments from the procession route.esakal
Updated on

Shiv Jayanti 2024 : शिवजयंतीनिमित्त महापालिका पूर्व आणि पश्चिम विभागाकडून मिरवणूक मार्गावर संयुक्त मोहीम राबविण्यात आली. मार्गात अडथळा निर्माण करणाऱ्या व्यावसायिकांचे अतिक्रमण काढण्यात आले. यावेळी दोन ट्रक साहित्य जप्त केले. शिवजयंतीनिमित्त जुने नाशिक वाकडी बारव ते पंचवटी कारंजापर्यंत मिरवणूक काढण्यात येते. (nashik Encroachment marathi news)

वाकडी बारव, दूध बाजार, भद्रकाली मार्केट, बादशाही कॉर्नर, मेन रोड, महात्मा गांधी रोड, रविवार कारंजा अशा मार्गाने मिरवणूक जाते. सोमवारी (ता.१९) शिवजयंती मिरवणूक निघणार आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण असल्याने मिरवणुकीत अडचण निर्माण होत असल्याच्या तक्रारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आल्या होत्या.

तक्रारीची दखल घेत उपायुक्त नितीन नेर यांच्या आदेशाने विभागीय अधिकारी योगेश रकटे, राजाराम जाधव यांच्या मार्गदर्शनात लिपिक विनायक जाधव, पश्चिम विभाग प्रमुख प्रवीण बागूल जीवन ठाकरे, सुनील कदम, बापू लांडगे, संतोष पवार, रतन गायकवाड, अनिल लोकरे, जगन्नाथ हंमरे, रमेश शिंदे, खैरनार, सूर्यवंशी, पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी वाकडी बारव.

Employees of Municipal Encroachment Removal Team removing encroachments from the procession route.
Shiv Jayanti 2024 : शिवजयंतीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त; मुख्य मिरवणुकीत 5 मंडळ

दूध बाजार, भद्रकाली, मेनरोड, धुमाळ पॉइंट, एमजी रोड, अशोक स्तंभ ते रविवार कारंजापर्यंत मिरवणूक मार्गावर अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली. बॅग, खुर्च्या, कपडे, स्टूल, स्टॅन्ड बोर्ड, कपड्यासह पुतळे तसेच इतर साहित्य असे दोन ट्रक साहित्य जप्त करून मार्ग मोकळा केला.

जप्त केलेले साहित्य आडगाव येथील गोडाऊनमध्ये जमा केले. मोहीम राबवताना व्यावसायिकांना रस्त्यावर अतिक्रमण करू नये, अशा सूचना देण्यात आल्या. यावेळी व्यवसायिकांची धावपळ उडाली होती. ( latest marathi news )

Employees of Municipal Encroachment Removal Team removing encroachments from the procession route.
Shiv Jayanti 2024 : शिवजयंतीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त; मुख्य मिरवणुकीत 5 मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.