Anand Bora
Anand Boraesakal

Nashik News : आनंद बोरांच्या छायाचित्रास तिसरे राष्ट्रीय पारितोषिक

Published on

नाशिक : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवांतर्गत राष्ट्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे देशातील आणि हौशी छायाचित्रकारांसाठी डिजिटल छायाचित्र स्पर्धा झाली. ‘नॅशनल हायवेज थ्रू द आइज ऑफ द कॅमेरा’ ही स्पर्धेची संकल्पना होती. ‘सकाळ’चे बातमीदार आनंद बोरा यांच्या छायाचित्रास या स्पर्धेत तिसरे पारितोषिक जाहीर झाले. वीस हजार रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

हेही वाचा: ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे सिन्नरजवळील छायाचित्र श्री. बोरा यांनी टिपले होते. त्यास हे पारितोषिक मिळाले आहे. समृद्धी महामार्ग देखरेख उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, राष्ट्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गाचे सरव्यवस्थापक राम सिंघ यांनी त्यांचे अभिनंदन केले. छायाचित्राच्या माध्यमाचा वापर करून स्पर्धेद्वारे देशातील राष्ट्रीय महामार्गांच्या बहुआयामी प्रतिमांची छायाचित्रे सादर करायची होती.

छायाचित्रकार आनंद बोरा यांनी टिपलेले छायाचित्र
छायाचित्रकार आनंद बोरा यांनी टिपलेले छायाचित्रesakal
Anand Bora
Nashik News : आम्ही खेळायचं कुठं? उद्यान असून नसल्यासारखे झाल्याने नागरिक त्रस्त

महामार्गांचे सौंदर्यशास्त्र आणि विस्तार, महामार्ग पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या अंमलबजावणीद्वारे होत असलेल्या दळणवळण सुविधा आणि सुलभ प्रवेशाचा संदेश देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा झाली. महामार्गांच्या कामाची माहिती जनतेला व्हावी, असाही उद्देश स्पर्धेचा होता. पारितोषिक वितरण लवकरच होणार आहे.

Anand Bora
Nashik News : पक्षी घरात उंदरांचा उपद्रव; पक्षी घराकडे NMCसह पक्षांची पाठ!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.