Dr. Bharti Pawar : आधुनिक तंत्रज्ञानाने दिव्यांग स्वावलंबी : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार

Dr. Bharti Pawar : अत्याधुनिक साहित्य दिव्यांगांना जीवनात स्वावलंबी व सक्षम करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.
Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar while interacting with disabled persons in the program of Disability Empowerment Department.
Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar while interacting with disabled persons in the program of Disability Empowerment Department.esakal
Updated on

Dr. Bharti Pawar : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या दिव्यांग सशक्तीकरण विभागातर्फे मिळणारे अत्याधुनिक साहित्य दिव्यांगांना जीवनात स्वावलंबी व सक्षम करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी केले. (Dr Bharati Pawar statement )

केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय, दिव्यांग सशक्तीकरण विभागाअंतर्गत जिल्हा परिषदेच्यावतीने गुरुवारी (ता.१५) कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात जिल्ह्यातील एक हजार ३९७ दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत कृत्रिम अवयव वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. पवार बोलत होत्या.

केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागाचे मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी ऑनलाइन सहभाग घेतला. आमदार प्रा. देवयानी फरांदे, महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को ) चे व्यवस्थापक अजय चौधरी आदींची यावेळी उपस्थिती होती.

डॉ. पवार म्हणाल्या की, केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या दिव्यांग सशक्तीकरण विभागाच्या वतीने वाटप होणारे साहित्य दिव्यांगांना दैनंदिन जीवनात स्वावलंबी व सक्षम करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. एलिम्को कंपनीमार्फत देण्यात येणाऱ्या साहित्याचा वापर कसा करावा याविषयी संपूर्ण माहिती दिव्यांग बांधवांनी जाणून घ्यावी, ज्यामुळे सहाय्यक साहित्याचा वापर करणे सहज शक्य होईल.

Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar while interacting with disabled persons in the program of Disability Empowerment Department.
Dr Bharti Pawar : केंद्र सरकार 2 लाख टन कांदा खरेदी करणार : डॉ. पवार

म्हणूनच जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील दिव्यांग बांधवांना त्यांनी नोंदणी केल्याप्रमाणे आवश्यक साहित्य उपलब्ध करून द्यावे. जेणे करून कोणीही दिव्यांग व्यक्ती यापासून वंचित राहणार नाही, या दृष्टिने प्रयत्न करावेत, अशा सूचनाही यावेळी डॉ. भारती पवार यांनी दिल्या.

इलेक्ट्रिक ट्रायसिकल, व्हील चेअरचे वाटप

कार्यक्रमा दरम्यान प्रत्येकी दोन इलेक्ट्रीक ट्रायसिकल, व्हील चेअर, श्रवण यंत्र, दृष्टिबाधितांसाठी स्मार्ट मोबाईल व स्मार्ट केन(काठी) साहित्याचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात आले. दरम्यान, एकूण दोन हजार २८७ लाभार्थ्यांपैकी जिल्ह्यातील नाशिक, चांदवड, नांदगाव, दिंडोरी, देवळा, कळवण.

सुरगाणा, पेठ, निफाड व येवला या १० तालुक्यातील एक हजार ३९७ लाभार्थ्यांना साधारण ७ ते ८ कोटी रुपयांच्या कृत्रिम अवयव व सहाय्यक साहित्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. तसेच उर्वरित ५ तालुक्यांतील पात्र लाभार्थ्यांना नंतरच्या टप्प्यात कृत्रिम अवयव व सहाय्यक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.

Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar while interacting with disabled persons in the program of Disability Empowerment Department.
Dr Bharti Pawar : कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना.... डॉ. भारती पवार यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.