पंचवटी : यंदा पाऊस पुरेसा पाऊस नसल्याने येणाऱ्या काही दिवसांत पाणीकपात होण्याची शक्यता आहे. त्यातच प्रभाग ६ मखमलाबाद गाव परिसरातील कॉलनी भागात पाणीपुरवठा कमी प्रमाणात होत आहे.
मात्र गेल्या अनेक दिवसांपासून क्षत्रिय माळी मंगल कार्यालयाजवळ पाणी गळती होत असल्याने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. (Nashik News Water leakage continues for many days Neglect of NMC Water Supply Department)
महापालिकेत सध्या प्रशासकीय राजवट सुरू असून शहर आणि परिसरातील अनेक समस्यांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. मनपाला कारभारीच नसल्याने समस्या मांडायच्या कोणाकडे, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.
शहरातील ग्रामीण भाग असलेल्या मखमलाबाद तसेच इतरही ग्रामीण भागाचा विकास झपाट्याने होत असताना मात्र नागरिकांना पुरेशा सुविधादेखील मिळत नाही.
मखमलाबाद परिसरातील अनेक कॉलनी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, तर अनेक भागात पाणीपुरवठादेखील कमी प्रमाणात होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
त्यातच गेले अनेक दिवसांपासून तर मखमलाबाद गावातील क्षत्रिय माळी समाज मंगल कार्यालयाजवळ पाणी गळती होत असल्याने रोज मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.
यंदा समाधानकारक पाऊस न पडल्याने नाशिककरांना पाण्याच्या समस्येला तोंड देण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर येणाऱ्या काळात पाणीकपातदेखील होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे पाणी गळतीकडे मनपा लक्ष देईल का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.त्यामुळे आता तरी मनपा प्रशासन जागे होईल का, असा प्रश्नही नागरिक उपस्थित करू लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.