Nashik News : ‘नंदिनी’ किनारी गॅबियन वॉलचे काम अखेर सुरू

Nashik : दोंदे पुलाजवळ नंदिनी नदीकिनारी अखेर गॅबियन वॉलच्या कामाला सुरुवात झाली आहे.
Gabion wall work started along Nandini River
Gabion wall work started along Nandini Riveresakal
Updated on

Nashik News : दोंदे पुलाजवळ नंदिनी नदीकिनारी अखेर गॅबियन वॉलच्या कामाला सुरुवात झाली आहे. ठाकरे गट व सत्कार्य फाउंडेशनच्या सततच्या दोन वर्षांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. नंदिनी नदीवर गॅबियन वॉल बांधण्यासाठी आर्थिक तरतूद करावी, यासाठी सत्कार्य फाउंडेशन यांच्या पुढाकाराने १३ डिसेंबर २०२१ ला निवेदन देण्यात आले. (Nashik News)

तत्कालीन महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी ८ फेब्रुवारी २०२२ ला अंदाजपत्रकात गॅबियन वॉलसाठी १ कोटी ६४ लाख ९० हजार रुपयांची तरतूद केली. बदललेली दर सूची व जीएसटीसह २०२३-२४च्या अंदाजपत्रकात वाढीव रक्कमेसह १ कोटी ९७ लाखांची तरतूद धरण्यात आली आहे.

या कामाची निविदा २५ एप्रिलला जाहीर झाली. राजकीय दबावामुळे प्रशासन निविदा उघडत नव्हते. शेवटी नंदिनी नदीत आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर ही निविदा उघडण्यात आली. यानंतर वर्कऑर्डर काढून काम सुरू होईपर्यंत सतत पाठपुरावा करण्यात आला. अखेर दोन दिवसांपूर्वी गॅबियन वॉलच्या कामाला सुरवात झाली आहे.

Gabion wall work started along Nandini River
Nashik News : कोरोनायोद्धे 50 लाखांच्या मदतीपासून वंचित! शासन, महापालिकेत टोलवाटोलवी

सत्कार्य फाउंडेशनचे बाळासाहेब मिंधे, मयूर आहेर, धवल खैरनार, संगीता देशमुख, भारती देशमुख, संगीता नाफडे, बाळासाहेब तिडके, फकिरराव तिडके, प्रभाकर खैरनार, विनोद पोळ, रवींद्र सोनजे, मनोज वाणी, सतीश मणियार, नीलेश ठाकूर, यशवंत जाधव, आनंदा तिडके, डॉ. शशिकांत मोरे.

बाळासाहेब राऊतराय, अनंत संगमनेरकर, सतीश कुलकर्णी, अशोक पाटील, संध्या छाया ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव देवरे, बाळासाहेब देशमुख, बापूराव पाटील, दिलीप दिवाणे, बन्सीलाल पाटील, मनोज पाटील आदींसह रहिवाशांनी महापालिकेचे आभार मानले आहे.

Gabion wall work started along Nandini River
Nashik News : जिल्ह्यात 7 तहसीलदारांना नोटीस; महसूल वसुलीत पिच्छाडीवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.