नाशिक/ मालेगाव : जैश- ए- महंमद या दहशतवादी संघटनेला फंडिंग केल्याच्या संशयावरून राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणा (एनआयए), दहशतवादविरोधी पथक (एटीएस) यांनी मालेगावात शनिवारी (ता. ५) पहाटे छापा टाकत होमिओपॅथी डॉक्टरची तब्बल १२ ते १४ तास चौकशी केली. संशयास्पद माहिती पथकांच्या हाती लागली असून, संशयित दांपत्याचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले. डॉक्टरला येत्या १७ तारखेला दिल्लीत चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात नोटीस बजावल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. (NIA raid call doctor from Malegaon to Delhi for questioning )
जैश- ए- महंमद या दहशतवादी संघटनेने राजस्थानातील रेल्वेस्थानके बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. यासंदर्भात ‘एनआयए’ने शनिवारी पहाटेपासून देशभरातील महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, दिल्ली आणि जम्मू-काश्मीर या राज्यांत २६ ठिकाणी छापे टाकले होते. नाशिक जिल्ह्यातील मालेगावसह छत्रपती संभाजीनगर, जालना येथेही छापे टाकले होते.
मालेगावातील अब्दुलानगरमधील होमिओपॅथी डॉक्टरची पथकाने तब्बल १२ ते १४ तास तपास करीत, त्याच्यासह पत्नीचे मोबाईल जप्त केले आहेत. डॉक्टरला येत्या १७ तारखेला दिल्लीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भातील नोटीस बजावली आहे. मालेगावात गेल्या वर्षीही ‘पीएफआय’च्या सदस्यांना ‘एटीएस’ने अटक केली होती.
सोशल मीडियातून संपर्क
संशयित होमिओपॅथी डॉक्टरचे अब्दुलानगरमध्ये छोटेखानी क्लिनिक आहे. संशयित डॉक्टर हा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पाकिस्तानातील काही ग्रुपच्या संपर्कात असल्याचे तपासातून समोर येत असल्याचे समजते. त्यासंदर्भातच पथकाने त्याची कसून चौकशी केली आहे, तसेच काही दस्तावेजही जप्त केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.