गणूर : जातिधर्माच्या नावावर होणाऱ्या निवडणुका, पैशांची ताकद ही व्यवस्थाच आम्हाला मोडायची असून, यावर प्रहार करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाची बॅट सज्ज आहे. आगामी विधानसभा निवडणुकांत पक्षाची बॅट षटकार मारेल. चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघातून गणेश निंबाळकर, तर निफाडमधून गुरुदेव कांदे पक्षाकडून उमेदवारी करतील, अशी घोषणा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी चांदवड येथे केली. रंगमहालाची पाहणी करण्यासाठी बुधवारी (ता. १८) ते आले असता या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. (Nimbalkar from Chandwad and Kande from Niphad in Assembly Election )
त्यांच्यासमवेत गणेश निंबाळकर, समाधान बागल व पदाधिकारी उपस्थित होते. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तिसरी आघाडी उभी करीत प्रस्थापित पक्षांना धक्का देण्याची तयारी चालविलेल्या बच्चू कडू यांनी या पत्रकार परिषदेत सत्ताधारी मंडळींवर निशाणा साधला. वर्षानुवर्षे चांदवडचे राजकारण पाण्यावर होत आहे. माझ्या मतदारसंघात ५० वर्षांत तीन धरणे झाली अन् माझ्या २० वर्षांत सात धरणे झाली. पाणीप्रश्न सोडविण्याची मानसिकता असली, की ५० वर्षांचा फसवणुकीचा इतिहासदेखील पुसता येतो. (latest marathi news)
यासाठीच प्रहार येत्या विधानसभा निवडणुकांत पक्षाकडून गणेश निंबाळकर यांना चांदवडमध्ये उमेदवारी देत आहे. तालुक्याचे कृषी क्षेत्राशी संबंधित प्रश्न गंभीर आहेत. अधिकारी वर्ग खासगी कंपन्यांना पूरक भूमिका घेतात त्यांना त्याचे पैसे मिळत असतील; परंतु प्रहार अशा अधिकाऱ्यांना धडा शिकवेन, असा दमच त्यांनी पीकविमा गैरप्रकारावरून अधिकाऱ्यांना दिला. रंगमहालाच्या कामकाजाबाबत समाधान बागल, गणेश निंबाळकर यांच्याकडून वेळोवेळी माहिती घेत असून, हे काम लवकरात लवकर कसे पूर्णत्वास नेता येईल याबाबत पाठपुरावा करू, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.
शेतकऱ्याच्या लेकराला उमेदवारी!
दरम्यान, आमदार कडू यांनी उमेदवार म्हणून जाहीर केलेले उमेदवार गणेश निंबाळकर हे शेतकरीपुत्र आहेत. शेती-मातीच्या प्रश्नांना घेऊन ते नेहमी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात. गेल्या लोकसभा निवडणुकांत कांदाप्रश्न निवडणुकीच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी निंबाळकर प्रयत्नशील होते. याच प्रश्नाला घेऊन हा मतदारसंघ लोकसभा निवडणुकांत भाजपने गमावला आहे. केंद्रीय मंत्र्याच्या घराबाहेर आंदोलनासाठी जात असताना नाशिक येथील अशोक स्तंभावर गणेश निंबाळकर यांचा ताफा अडविण्यात आला होता. सुमारे अडीच-तीन तास चाललेल्या या आंदोलनाने राज्याचे लक्ष वेधून घेतले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.