Street Lights
Street Lightsesakal

Nashik News : अंबासनला नवरात्रीचे नऊ दिवस अंधारात! पथदिप बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य

Latest Nashik News : संबंधित वीज वितरणाच्या ठेकेदाराकडून बंद केबलच्या दिरंगाईमुळे गावातील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
Published on

अंबासन, (जि. नाशिक) : नवरात्रीचे नऊ दिवस अंधारात येथे दिवसापासून आदिवासी वस्तीसह वाल्मीक नगरमधील पथदीप बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. संबंधित वीज वितरणाच्या ठेकेदाराकडून बंद केबलच्या दिरंगाईमुळे गावातील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. (Nine days of Navratri in Ambasan in darkness)

गेल्या एक महिन्यापासून अंबासन फिडरवर बंद केबलचे काम संबंधित ठेकेदाराकडून अतिशय धीम्या गतीने सुरू आहे. यामुळे सारदे काकडगाव व अंबासन येथील वीज ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत वीज वितरण कंपनीत तक्रारी अर्ज दाखल करूनही अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान गावात ग्रामपंचायत मार्फत प्रत्येक खांबावर पथदीप बसवण्यात आलेले आहेत. बंच केबलच्या कामातील दिरंगाईमुळे आदिवासी वस्ती व वाल्मीकनगर येथील पथदिप गेल्या नऊ ते दहा दिवसापासून बंद अवस्थेत आहेत. संबंधित ठेकेदाराकडून मोजकेच मजूर आणले जात असल्याने कामावर ताण पडत आहे.

गावात अनेक लोखंडी थांब कमरेत वाकलेले दिसून येत आहेत हे खांब कधी कोसळतील याचा अंदाज येत नसल्याने वाकलेले धोकादायक खांब बदलणे गरजेचे आहे. मात्र संबंधितांकडून याच खांबावर केबल टाकून आपले काम उरकते घेतले जात असल्याचे निदर्शनात येत आहे. (latest marathi news)

Street Lights
Jalgaon Heavy Rain : जिल्ह्याच्या 6 महसूल मंडळांत अतिवृष्टी, अनेक भागांत रात्री मुसळधार; खरिपाचे मोठे नुकसान

ग्रामपंचायत प्रशासनाने मागील काही दिवसापूर्वी याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना तक्रारी अर्ज दाखल केला होता मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. अंबासन गावातील बंच केबलच्या कामाचा निपटारा दोन ते तीन दिवसात करावा अन्यथा गावात वीज वितरणला कुठलेही काम करू दिले जाणार नसल्याचे वीज ग्राहकांकडून बोलले जात आहे.

"आम्ही एक आठवड्यापूर्वी वीज वितरण कंपनीत ग्रामपंचायत प्रशासन मार्फत तक्रारी अर्ज दाखल केला होता. मात्र दखल घेतली नसण्याचे दिसून येते. गावात संबंधितांनी वीस पुरवठा सुरळीत करावा." - शशिकांत कोर, ग्रामपंचायत सदस्य अंबासन.

Street Lights
Dr. Neelam Gorhe : मी नव्हे, मुख्यमंत्र्यांचे विश्वासू इच्छूक : डॉ. गोऱ्हे; भाजपच्या जागेसाठी शिवसेनाही आग्रही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.