Gram Sadak Yojana : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत 68 कोटी 76 लाख निधीस मंजुरी

Nashik News : निफाड तालुक्यातील विविध ४१ किलोमीटरच्या रस्त्यांसाठी सुमारे ६८ कोटी ७६ लाख निधीस मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली.
MLA Dilip Bankar
MLA Dilip Bankaresakal
Updated on

पिंपळगाव बसवंत : मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ संशोधन व विकास अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील विविध रस्त्यांना दर्जोन्नती करण्यासाठी प्रसासकीय मान्यता देण्यात आली असून, यामध्ये आमदार दिलीप बनकर यांनी सुचविलेल्या निफाड तालुक्यातील विविध ४१ किलोमीटरच्या रस्त्यांसाठी सुमारे ६८ कोटी ७६ लाख निधीस मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली. (Gram Sadak Yojana)

यामध्ये पालखेड आहेरगाव रस्ता (४.३८० किलोमीटर, सहा कोटी २९ लाख), बेरवाडी ते पिंपळगाव निपाणी रस्ता (३.६४० किलोमीटर, पाच कोटी १९ लाख), दावचवाडी ते कुंभारी रस्ता (३.७२० किलोमीटर, पाच कोटी ५५ लाख), कसबे सुकेणे ते निफाड साखर कारखाना रस्ता (के. के. वाघ शाळा) (चार किलोमीटर, आठ कोटी तीन लाख).

निफाड ते नांदुर्डी रस्ता (५.९४० किलोमीटर, ११ कोटी ५० लाख), शेतमळा-पिंपळगाव बसवत ते मुखेड रस्ता (३. ५०० किलोमीटर, पाच कोटी ३१ लाख), (करंजगाव, चापडगाव ते ग्रामा ४८. प्रजिमा १०६. रस्ता (५. ८२० किलोमीटर, सात कोटी ७१ लाख), पिंपळगाव बसवत (रामा २९) उबरखेड आथरे वस्ती, चिंचखेड शिव रस्ता ते निपाणी मळा. (latest marathi news)

MLA Dilip Bankar
Nashik Police : आयुक्तांचा दणका, प्रभारींच्या उचलबांगडी; काही थेट कंट्रोल रूममध्ये

साकोरे मिग ते राज्य मार्ग ०३ रस्ता (९. १७० किलोमीटर, १८ कोटी ९१ लाख), या विविध रस्तांना सुमारे ६८ कोटी ७६ लाखांच्या निधीस प्रसासकीय मान्यता देण्यात आली आहे सर्व रस्ते काँक्रिटीकरण करण्यात येणार असून, आवश्यक त्या ठिकाणी पूल, मोऱ्या बांधण्यात येणार असल्याची माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली.

निफाड तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी मोठ्या रक्कमेचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार दिलीप बनकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादा भुसे, ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ, तसेच संबंधित अधिकारीवर्गाचे निफाड तालुक्यातील जनतेच्या वतीने आभार मानले.

MLA Dilip Bankar
Nashik Dengue Update : डेंगी बाधित रुग्णांचे नमुने तपासणीअभावी पडून; तपासणी किट संपल्यामुळे अहवाल प्रलंबित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.