Summer Heat : उन्हाच्या तीव्रतेने कॅलिफोर्निया होरपळला!

Nashik News : पारा ३७ अंशांच्या पार गेला आहे. त्यामुळे पिके, जनावरांसह मानवाला त्याची धग जाणवत आहे. निफाड तालुक्यातील कालवा नदी, नाले, ओहोळ, साठवण बंधारे, विहिरी, कूपनलिका आटल्या आहेत.
Goi riverbed in the taluka is dry. Effect of heat on crops.
Goi riverbed in the taluka is dry. Effect of heat on crops.esakal
Updated on

निफाड : गेल्या काही वर्षांपासून वातावरण बदलाचा फाटका निफाड तालुक्याच्या सर्वच भागाला बसत आहे. पारा ३७ अंशांच्या पार गेला आहे. त्यामुळे पिके, जनावरांसह मानवाला त्याची धग जाणवत आहे. निफाड तालुक्यातील कालवा नदी, नाले, ओहोळ, साठवण बंधारे, विहिरी, कूपनलिका आटल्या आहेत. (Niphad Farmers are faced with issues of saving crops and animals due to drought increasing temperature)

राज्यासह निफाड तालुक्यामध्ये मागील दोन महिन्यांपासून उन्हाच्या तडाख्यामुळे शिवारात असलेला ऊस, मका, भाजीपाल्यासह जनावरांचा चारा आदी पिके कोमेजू लागले आहेत. पशु-पक्ष्यांची चारा-पाण्याअभावी वाताहत होत आहे. नर्सरीमधून आणलेली महागडी रोपे डोळ्यांदेखत उन्हाच्या तीव्रतेमुळे जळून जात आहे.

यामुळे परिसरातील शेतकरी क्रॉप कव्हरचे अच्छादन करून पीक वाचविण्यावर भर देताना दिसून येत आहे. परंतु सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अच्छादन फाटून नुकसान होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

पिके वाचविण्यासाठी अतिरिक्त खर्च

उन्हाच्या तीव्रतेने नवीन लागवड केलेली टोमॅटो, वालवड आदी पिंकासह फळपिके, भाजीपाला कोमेजून जळण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सद्या पिकांच्या भोवती तण वाढू नये म्हणून प्लॅस्टिकचे अच्छादन केले आहे. परंतु उन्हाची तीव्रता सहन न करू शकल्याने तेही फाटू लागले आहे. (latest marathi news)

Goi riverbed in the taluka is dry. Effect of heat on crops.
Nashik News : डॉ. गेडाम यांच्या ‘एंट्री’ ने अधिकाऱ्यांना धडकी

पिकांचा बचाव करण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर क्रॉप कव्हर खरेदी करत आहे. यामुळे खर्च वाढला आहे. तसेच रोपे जळत असल्याने नवीन रोपांची खरेदीचा खर्च व लागवडीसाठी मजुरीचा अतिरित खर्च वाढला आहे.

उन्हाची तीव्रता अशीच राहिली तर पिण्याच्या पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते. जनावरांसाठी विकत किंवा शेतातील पिके काढून देण्याच्या बदल्यात सुका आणि ओला चारा साठवून ठेवणाऱ्यांपैकी बऱ्याच शेतकऱ्यांचा चारा जळून नष्ट झाल्याच्या घटना घडल्या आहे.

"पाण्याअभावी शेतात उभ्या असणाऱ्या पिकांवरही परिणाम पहावयास मिळत आहे. चारा पिकांना कितीही पाणी दिले तरी उन्हाच्या तीव्रतेने पिके सुकू लागली आहेत. जनावरांवर उष्माघाताचा परिणाम दिसू लागला आहे." - विकास रायते, खडक माळेगाव

"मागच्या हंगामामध्ये पाऊस न झाल्याने रब्बीबरोबर खरिपाचे देखील मातेरे झाले होते. कडक उन्हामुळे विहीर, नद्यांमधील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत आहे. उन्हाचा पारा असाच राहिला तर पिके वाचविणे मुश्कील होणार आहे." - बाबूराव सानप, सोनेवाडी खुर्द

Goi riverbed in the taluka is dry. Effect of heat on crops.
Nashik News : आता ग्रामसेवक संघटनांमध्ये जुंपली! फूट पडली नसल्याचा ग्रामसेवक युनियनचा दावा, केवळ चौघांचे राजीनामे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.