निफाड : मे महिन्याच्या सुरवातीलाच दुष्काळी भागांत चारा टंचाईचा संकट गडद झाले आहे. पावसाळ्यात जनावरांसाठी चारा साठवणूक महत्त्वाची असल्याने विविध दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचे तांडे हिरव्या चाऱ्यासाठी गोदाकाठ भागांत दिसायला लागले आहे. यंदाच्या हंगामात निफाडचा गोदाकाठ दुष्काळी चाऱ्यासाठी वरदान ठरतो आहे. साखर कारखान्यांचे गळीत हंगाम संपल्याने उसाचे वाढे बंद झाले आहेत. (Nashik Niphad fodder)
त्यामुळे दुष्काळी भागात चाराटंचाई जाणवू लागली आहे. कडब्याच्या दराने उच्चांक गाठला असून शेकडा अडीच ते तीन हजार रुपये मोजावे लागतात. ऊस देखील साडे चार हजार पांड्याने विकला जातो आहे. कडब्या बरोबरच मक्याचा चाराही महागला आहे. पशुखाद्याच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत.
पशुधन सांभाळताना शेतकरी मेटाकुटीला आल्याचे दिसत आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने माळरानावरची पिके वाळून गेली आहेत. त्यामुळे ओल्या चाऱ्याबरोबरच शेतकऱ्यांना सुक्या चाऱ्याचाही प्रश्न भेडसावत आहे.
दुष्काळी भागातून तांडे
निफाड तालुक्याच्या पूर्व भागात कडब्याचा दर २,५०० ते ३,००० रुपयांपर्यंत शेकडा पेंडी असा झाला आहे. दरम्यान निफाडच्या गोदाकाट भागातील उसाच्या क्षेत्रात चांदवड नांदगाव येवला या दुष्काळी पट्ट्यातून साडे चार हजार रुपये पांडाणे जनावरांसाठी ऊस शेतकरी घेऊन जात आहे. (latest marathi news)
पाचपेक्षा जास्त जनावरे असलेल्या शेतकऱ्यांना पावसाळ्यापूर्वी जनावरांच्या चाऱ्याची मोठ्या प्रमाणात साठवण करून ठेवावी लागते. त्यामुळे अनेक शेतकरी गावोगावी जाऊन कडबा तसेच मका खरेदी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. कडबा कुट्टी करून, पावसाळ्यात जनावरांना चाऱ्याची टंचाई भासू द्यायची नाही.
यासाठी शेतकरी आतापासून कामाला लागला आहे. कडबा व मका या पिकांकडे जनावरांसाठी पोषक चारा म्हणून शेतकरी पाहत असतो. सध्या मागणी वाढल्यामुळे काही शेतकरी शेतामध्ये उभ्या ज्वारी व मका पिकांची मुर घासासाठी विक्री करीत आहेत. कमी पावसामुळे मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांनी आडसाली व सुरू उसाची लागवड केली नाही. त्यामुळे आगामी काळात हिरव्या चाऱ्याची टंचाई जाणवणार हे निश्चित
"दुष्काळी परिस्थितीमुळे गोदावरी खोऱ्यातील ऊस दुष्काळी भागातील जनावरांसाठी मदत ठरत आहे. चांदोरी, सायखेडा, निफाड, शिवरे भागातून मोठ्या प्रमाणात शेतकरी ऊस नेतात." - संदीप टर्ले (शेतकरी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.