निफाड : मध्य रेल्वे मार्गावरील निफाड रेल्वेस्थानकावर प्रवाशांसाठी मूलभूत सोयी सुविधा नाहीत. निफाड तालुक्यातील सुमारे तीस - चाळीस गावांतील नागरिकांसाठी स्थानक आहे. देशभरात स्थानक डिजिटल होत असताना निफाड स्थानक मात्र डिजिटल लूकच्या प्रतिक्षेत आहे निफाडला पॅसेंजर मेमु या रेल्वे गाड्यांसह काही जलद रेल्वेगाड्यांना थांबा आहे. (Niphad Railway Station Awaits Digital Look)
स्थानकाचा वापर मनमाड, नाशिक, ठाणे, कल्याण, मुंबई, नागपूर, कोलकाता, वाराणसी पुण्याला जाण्यासाठी होतो. सुरत शिर्डी महामार्गामुळे निफाड रेल्वे स्टेशनला प्रवाशांची मोठी वर्दळ असते मात्र त्या तुलनेत या रेल्वे स्टेशनला सुविधा नसल्याने प्रवाशांचा हिरमोड होतो.
"निफाड प्लॅटफॉमची उंची रेल्वेगाडीत प्रवाशांना सहज प्रवेश करता येईल. अशा बोगीशी समांतर वाढविणे गरजेचे आहे. जलद एक्स्प्रेस गाड्याचे बोगी नंबर, आरक्षित, सर्वसाधारण, प्रथम श्रेणी, फलाटावरील स्थान दर्शविण्यासाठी अद्ययावत माहिती तंत्रज्ञानाद्वारे डिजिटल इंडिकेटर (दर्शक) आवश्यक आहे." - आनंद मोगल कोठुरे (latest marathi news)
"निफाड रेल्वे स्थानकात प्रवाशांना असलेले प्रतिक्षालय कमी पडते. त्याचे नूतनीकरण करुन महिला पुरुषांसाठी स्वतंत्र तसेच प्रथम श्रेणीने प्रवास ककरणाऱ्यांसाठी स्वतंत्र प्रतिक्षालयाची आवश्यकता आहे." - छोटुकाका पानगव्हाणे (उगांव)
"निफाड हे तालुक्याचे ठिकाण आहे. येथून अनेक उद्योजक व्यापारी नोकरदार व्यावसायिक विद्यार्थी हे नियमित नाशिक मुंबई भुसावळ कोलकाता आदी महत्त्वाच्या शहरांत जात असतात त्यामुळे कनेक्टिव्हिटी वाढण्यासाठी निफाड रेल्वे स्टेशनला वंदे भारत एक्सप्रेसला थांबा द्यावा." - डॉ कविता धारराव (नगराध्यक्षा निफाड)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.