चांदोरी : एकीकडे शेतमालाला मिळत नसलेला भाव, त्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात नेहमीच अश्रू पहायला मिळतात. कष्ट पाचवीला पुजलेल्या शेतकऱ्याच्या आयुष्यात नेहमीच समस्यांचे बांध असतात. मात्र, हे सर्व करत असताना शेतकऱ्याची पोरगी मात्र मोठी स्वप्न पाहते. अशाच एका शेतकऱ्याच्या मुलीने स्वप्न पाहिलं आणि ते सत्यात उतरवलं. (Rutuja Arun Sangle cleared for posts simultaneously in examinations conducted through MPSC)
अल्पभूधारक शेती असलेल्या आपल्या शेतीमध्ये कष्ट करून गुजराण करणाऱ्या आई-वडिलांच्या पोटी जन्मलेल्या तामसवाडीच्या एका लेकीने कष्टाचे चीज केले. वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे तरुण परीक्षेत पात्र होण्यासाठी जीवाचे रान करतात. रात्रंदिवस अभ्यास करून परीक्षेत यशस्वी होण्यासाठी झटत असतात. मात्र, असं असतानाही अनेकांच्या पदरी निराशाच येते.
पण, या सर्वांना अपवाद ठरली गोदाकाठ भागातील तामसवाडी (ता. निफाड) येथील ऋतुजा. तिने एकाच वेळी चार परीक्षांचा फॉर्म भरला आणि चारही परीक्षेत यश मिळवले. अलिकडेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून झालेल्या परीक्षांचे निकाल जाहिर झाले. त्यात ऋतुजा अरुण सांगळे हिने एकाच वेळी चार पदांवर यश मिळवले.
स्वयं अध्ययनावर लक्ष देत कोणत्याही प्रकारचा क्लास न लावता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राजपत्रित अधिकारी जलसंपदा विभाग, महाराष्ट्र नगर परिषद स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, जिल्हा परिषद कनिष्ट अभियंता, अमरावती, जिल्हा परिषद स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, नाशिक व जलसंपदा विभाग स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक, औरंगाबाद या परिक्षेत तिने यश मिळवले. (latest marathi news)
अरुण व नीता सांगळे या शेतकरी दाम्पत्याची कन्या ऋतुजाचे प्राथमिक शिक्षण तामसवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण म्हाळसाकोरे येथील आरुढ विद्यालय, तर शासकीय पदविका नाशिक येथे २०१६ ते २०१९ मध्ये घेतल्यानंतर जळगाव येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय बिटेक आर्किटेक्ट २०१९ ते २०२२ मध्ये पूर्ण केले. शिक्षणाबरोबर स्पर्धा परीक्षा देत यश संपादन केले.
"कोणतेही ध्येय गाठायचे असेल तर वेळेचे नियोजन आणि योग्य ते मार्गदर्शन असणे अत्यंत गरजेचे असते. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी कधीच शिक्षणाचे माध्यम अडचण ठरू शकत नाही, महत्वाचे असते ते कुटुंबाचा पाठिंबा आणि स्वतःवर असलेला आत्मविश्वास. माझ्या या यशात माझे वडील आणि काका यांचे अत्यंत महत्वाचे योगदान आहे." - ऋतुजा अरुण सांगळे, तामसवाडी, ता. निफाड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.