Nashik News : निफाडला खड्ड्‌यात बसून ‘प्रहार’चे आंदोलन! खड्ड्‌यांमुळे ट्रॅक्टर उलटून कांदे रस्त्यावर; शेतकऱ्याचे नुकसान

Latest Nashik News : धारणगाव खडक (ता. निफाड) येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या घटनेची दखल घेत ‘प्रहार’तर्फे महामार्गावरील खड्ड्‌यात बसून आंदोलन करत शासन व संबंधित विभागाविरोधात रोष व्यक्त करण्यात आला.
Prahar officials along with Sagar Nikale while protesting by sitting in a pothole on the highway. The overturned tractor in the second photo.
Prahar officials along with Sagar Nikale while protesting by sitting in a pothole on the highway. The overturned tractor in the second photo.esakal
Updated on

निफाड : नाशिक- छत्रपती संभाजी महामार्गावर शनिवारी (ता.२८) सकाळी आठला आचोळा नाला येथे कांद्याने भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली महामार्गावरील असलेल्या खड्ड्‌याच्या साम्राज्यामुळे उलटून सर्व कांदे रस्त्यावर पसरले. यामुळे धारणगाव खडक (ता. निफाड) येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या घटनेची दखल घेत ‘प्रहार’तर्फे महामार्गावरील खड्ड्‌यात बसून आंदोलन करत शासन व संबंधित विभागाविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. (niphad sit in pit protest by Prahar)

नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहे वारंवार वाहने बंद पडतात या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना खड्ड्याचा अंदाज येत नसून अपघातांना निमंत्रण मिळत आहे. शनिवारी (ता.२८) सकाळी धारणगाव खडक येथील शेतकरी तुकाराम जाधव हे ट्रॅक्टरवर कांदा घेवून पिंपळगाव बाजार समितीकडे जात असताना आचोळा नाला येथे त्यांचा ट्रॅक्टरला खड्ड्‌यामुळे उलटून अपघात झाला. यामुळे सर्व कांदे रस्त्यावर पसरले.

घटनेची माहिती कळताच प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाउपाध्यक्ष सागर निकाळे यांनी त्याच साचलेल्या पाण्याच्या खङ्ङ्यामध्ये बसून आंदोलन केले. तसेच सदर घटनेस जबाबदार असलेल्या विभागाने शेतकरी बांधवास अर्थिक नुकसान भरपाई द्यावी तसेच तातडीने महामार्गावरील सर्व खड्डे चांगले साहित्य वापरुन दुरुस्त करण्याची मागणी केली. याप्रसंगी ज्ञानेश्वर सांगळे. माणिक गायकवाड, रवींद्र आहिरे, गोविंद आंबेकर, सचिन भोसले.आदी पदाधिकारी उपस्थितीत होते. (latest marathi news)

Prahar officials along with Sagar Nikale while protesting by sitting in a pothole on the highway. The overturned tractor in the second photo.
Malegaon MSRTC Depot : उत्पन्नावर आघाडीवर असूनही मालेगाव आगाराला समस्यांचा विळखा!

आठ दिवसापूर्वीच मलमपट्टी

नैताळे ते निफाड दरम्यान मोठ्या प्रमाणात बुजविलेल्या खड्ड्यांनी पुन्हा डोकेवर काढले आहे. या खड्ड्‌यांची आठ दिवसापूर्वीच मलमपट्टी करण्यात आली होती. मात्र, पुन्हा या रस्त्यांची अवस्था जैसे थे झाली आहे.

"सार्वजनिक बांधकाम खात्याचा भोंगळ कारभाराचा परिणाम आहे. या घटनेची दखल घेऊन तत्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, तसेच संबंधित शेतकऱ्यास नुकसान भरपाई दिली जावी. जर मागणीची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल."- सागर निकाळे

Prahar officials along with Sagar Nikale while protesting by sitting in a pothole on the highway. The overturned tractor in the second photo.
Nashik News : मुस्लिम पालकांचा गणवेश योजनेला विरोध! भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचे शिक्षणमंत्र्यांना साकडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.