Nashik Police : विद्यार्थिनीला निर्भया-दामिनी पथकाचा मदतीचा हात; पोलिसांनी जपली सामाजिक बांधिलकी

Nashik News : चौकशीतून जे समोर आले, त्यासाठी मदतीचा हात दिल्याने त्या मुलीच्या चेहर्यावर हास्याची लकेर उमटली. तर, शहर पोलीस आणि निर्भया-दामिनी पथकाच्या सामाजिक बांधिलकीचे कौतूक होते आहे.
Female staff members of Nirbhaya and Damini team handing out compass boxes to schoolgirls
Female staff members of Nirbhaya and Damini team handing out compass boxes to schoolgirlsesakal
Updated on

Nashik Police : घरातून काहीशा कारणातून रडत-रडतच रस्त्याने सिन्नर फाट्याकडे निघालेल्या शालेय मुलीची माहिती मिळताच शहर पोलिसांच्या निर्भया, दामिनी पथकातील महिलांनी पोलीसांनी तिला ताब्यात घेतले. चौकशीतून जे समोर आले, त्यासाठी मदतीचा हात दिल्याने त्या मुलीच्या चेहर्यावर हास्याची लकेर उमटली. तर, शहर पोलीस आणि निर्भया-दामिनी पथकाच्या सामाजिक बांधिलकीचे कौतूक होते आहे. (Nashik Nirbhaya Damini team help female student)

दोन दिवसांपूर्वीची घटना. एक १४ वर्षांची मुलगी. तिचे नाव श्वेता सोनकांबळे. घरची परिस्थिती नाजूक. आई कामाला जाते त्यावर कुटूंबियांचा उदरनिर्वाह चालतो. त्या दिवशी श्वेताला शाळेची कम्पॉस बॉक्सची गरज होती. त्यासाठी तिने आईकडे पैसे मागितले. तिच्या आईकडे पैसे नसावेत. त्यामुळे तिने नकार दिला. तरीही श्वेताने अभ्यासासाठी कम्पॉस बॉक्सची गरज असल्याचे विनवणी करीत सांगितले. पण तिच्या आईकडे त्यासाठी पैसेच नसल्याने तिचाही नाईलाज झाला असावा.

त्यामुळे रडवेल्या झालेल्या श्वेताने घरातून बाहेर पडली आणि सिन्नर फाट्याच्या दिशेने रडत-रडतच जात होती. सदरची बाब त्याच परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी कार्यरत असलेल्या ट्रॅफिक पोलिसाने हेरली. त्यांनी तत्काळ यासंदर्भातील माहिती निर्भया आणि दामिनी पथकाला कळविली.

संदेश मिळताच, निर्भया पथकावरील महिला पोलीस नाईक अनुराधा दिघे, महिला पोलीस आशा रुईकर, दामिनी पथकातील महिला कॉन्स्टेबल ज्योती पवार, महिला कॉन्स्टेबल सपना बागुल या सिन्नर फाटा याठिकाणी पोहोचल्या आणि पुढचा सारा उलगडा झाला. (latest marathi news)

Female staff members of Nirbhaya and Damini team handing out compass boxes to schoolgirls
CM Eknath Shinde : नीती आयोगाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी काय मागितलं? बैठकीनंतर म्हणाले...

कम्पॉस बॉक्स मिळताच हसली

निर्भया आणि दामिनी पथकातील महिला पोलीसांनी श्वेताला ताब्यात घेत तिला विश्वासात घेतले आणि चौकशी केली. त्यावेळी ती रडत असल्याचे कारण सांगितले. त्यांनी तिला तत्काळ एक कम्पॉस बॉक्स खरेदी करून दिले. तिला नाशिकरोड पोलिस ठाण्यात आणले.

त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनीही तिची आस्थेने विचारपूस केली. त्यानंतरच्या तिच्या आई-वडलांना बोलावून घेत श्वेताला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच, शैक्षणिक अडचण आल्यास मदत करण्याचे आश्वासनही दिले.

Female staff members of Nirbhaya and Damini team handing out compass boxes to schoolgirls
Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.