Nashik Women Police: निर्भया-दामिनी पथके टवाळखोरांविरोधात आक्रमक! महाविद्यालय, खासगी क्लासेसला भेट; छेडछाडी करणाऱ्यांना चोप

Nashik News : गेल्या महिन्याभरातून या पथकांनी सुमारे चारशे पेक्षा अधिक टवाळखोरांवर कारवाई केली असून, बेपत्ता झालेल्या सुमारे २० जणांचा शोध घेऊन त्यांना नातलगांच्या ताब्यात दिले आहे.
Nirbhaya & Damini Squad action
Nirbhaya & Damini Squad actionesakal
Updated on

Nashik Women Police : पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेनुसार पोलीस आयुक्तालय हद्दीत सक्रिय करण्यात आलेल्या निर्भया आणि दामिनी मार्शल्स पथकांनी टवाळखोरांविरोधात धडक कारवाई करीत चांगलाच चोप दिला आहे. गेल्या महिन्याभरातून या पथकांनी सुमारे चारशे पेक्षा अधिक टवाळखोरांवर कारवाई केली असून, बेपत्ता झालेल्या सुमारे २० जणांचा शोध घेऊन त्यांना नातलगांच्या ताब्यात दिले आहे. (Nashik Nirbhaya Damini teams aggressive against gangs)

शहर पोलीस आयुक्तालयात दामिनी व निर्भया हे महिला पोलिसांचे विशेष पथक कार्यरत होते. मात्र, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून, शहरातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी आयुक्तालय हद्दीतील पोलीस ठाणेनिहाय महिला पोलिस अंमलदारांचे दामिनी पथक महिन्याभरापूर्वीच नेमण्यात आले.

त्यामुळे या पथकाकडे महिलांना थेट संपर्क साधून मदत मागणे शक्य झाले होते. पंचवटी, सरकारवाडा, अंबड आणि नाशिकरोड असे चार विभागात कार्यरत राहणाऱ्या दामिनी आणि निर्भया पथकासाठी स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांकही जारी करण्यात आलेला होता. या पथकातील ३८ महिला अंमलदार हेल्पलाईनवरील तक्रारींची सोडवणुकीची जबाबदारी देण्यात आलेली आहे.

पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्याकडे या पथकांचे नेतृत्व आहे. गेला महिनाभर लोकसभा निवडणुकीची धामधुम आणि बंदोबस्तात पोलीस यंत्रणा व्यस्त असतानाही दामिनी व निर्भया पथकांनी आपआपली जबाबदारी चोखपणे सांभाळताना सुमारे चारशेपेक्षा अधिका टवाळखोर, हुल्लडबाजी करणाऱ्यांना चोप देत कारवाई केली आहे.

कुठे चोप, कुठे भेटी

दामिनी, निर्भया पथकांतील महिला अंमलदारांनी टवाळखोरांना जागेवरच चोप देत कारवाई केली. उद्याने, मोकळ्या मैदानांवर मुलींची छेडछाडी करणाऱ्यांना दंडुक्याचा प्रसाद दिला. यासह शाळा, महाविद्यालय व खासगी क्लासेसला भेटी देत, विशेषत: मुलींना छेडछाडीसंदर्भात तक्रारी करण्याचे आवाहन केले. तसेच, समाजातील अत्याचार, शोषण यासंदर्भात समुपदेशनही केले आहे.

बेपत्तांचाही घेतला शोध

अलिकडे घरात न सांगता निघून जाण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. निर्भया पथकाने अशा काही तक्रारींचा शोध घेत बेपत्ता असलेल्यांचा शोध घेऊन परत नातलगांच्या ताब्यात दिले आहे. ६५ वर्षीय नंदा तानाजी सलगर यांना मंजुला पॅलेस (संभाजीनगर रोड) येथून शोधून नातलगांच्या स्वाधीन केले. अशाप्रकारे सुमारे २५ बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध घेत नातलगांच्या हवाली केले आहे. (latest marathi news)

Nirbhaya & Damini Squad action
Nashik Police Election Duty : पोलिसांवरील ताण झाला हलका! लोकसभा निवडणुकीच्या सततच्या बंदोबस्तामुळे होता तणाव

दामिनी पथक.....टवाळखोर कारवाई... स्टॉप अँड सर्च... शाळा/महाविद्यालयांना भेट

पंचवटी ..... १७७ ......१९ ..... ४

सरकारवाडा ....... ६६ ...... १७ ..... ३

अंबड ...... ५२ ..... २१ ..... ६

नाशिकरोड ...... १८४ ...... १६ ...... ५

निर्भया पथक ...... बेपत्ता शोध

पंचवटी.... ८

सरकारवाडा ..... १

अंबड ...... १

नाशिकरोड ...... १५

निर्भया/दामिनी हेल्पलाईन

पंचवटी विभाग - ९४०३१६५८३०

सरकारवाडा विभाग - ९४०३१६५६७४

अंबड विभाग - ९४०४८४२२०६

नाशिकरोड विभाग - ९४०३१६५१९३

"आयुक्तालय हद्दीत दामिनी, निर्भया पथकामार्फत कारवाई अधिक तीव्र केली जाणार आहे. महिलांनीही मदतीसाठी या पथकांच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा."

- मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त.

Nirbhaya & Damini Squad action
Nashik Police Election Duty : EVM च्या ‘स्ट्राँग रुम’ भोवती पोलिसांची फुट पेट्रोलिंग! दरतासाला सुरक्षेचा आढावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.