NMC News : महापालिकेकडून मार्चअखेर वसुलीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मोहिमेअंतर्गत पश्चिम विभागातील पाच दिवसात पाच गाळे सील करण्यात आले असून, यातून ६ कोटी २५ लाख भाडे वसूल करण्यात आले आहे. महापालिकेचे शहरात २३०० गाळे व ओटे आहेत. यातील दीड हजार गाळेधारकांनी महापालिकेचे भाडे थकविले आहे. (nashik NMC 5 shop of Municipal Corporation are sealed due to rent arrears marathi news)
त्यामुळे मार्चअखेर महसूल वृद्धी करण्याच्या अनुषंगाने कर विभागाने थकबाकी असलेल्या गाळे सील करण्याची मोहीम हाती घेतली आहे. १ ते १५ मार्च या कालावधीमध्ये थकबाकीदार गाळे सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे. ५० कोटी रुपये भाडे थकलेल्या पश्चिम विभागातील शरणपूर मिनी मार्केटमधील पाच गाळ्यांना सील ठोकण्यात आले.
यातून ६ कोटी २५ लाख रुपयांचे भाडे वसूल करण्यात आले. थकीत भाडे तत्काळ भरावे, असे आवाहन कर विभागाचे उपायुक्त श्रीकांत पवार व सहाय्यक आयुक्त मयूर पाटील यांनी केले आहे. (latest marathi news)
विभागनिहाय थकीत भाडे
- पंचवटी- एक कोटी ९६ लाख
- सिडको- एक कोटी ३१ लाख
- सातपूर- चार कोटी ९२ लाख
नाशिक रोड- पाच कोटी ८५ लाख
- पश्चिम- २५ कोटी ६६ लाख
- पूर्व- पाच कोटी ८४ लाख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.