NMC News : 9 हजार पदांचा आकृतिबंध मंजूर; महासभेची मोहोर, कालबाह्य 662 पदे निरस्त

NMC : महापालिकेला ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाल्याने त्यानुसार पदांचा आकृतिबंधाला मंजुरी दिली जाणार आहे.
NMC
NMCesakal
Updated on

NMC News : महापालिकेला ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाल्याने त्यानुसार पदांचा आकृतिबंधाला मंजुरी दिली जाणार आहे. यापूर्वी रद्द करण्यात आलेला चौदा हजार पदांचा प्रस्ताव रद्द करून नव्याने तयार करण्यात आलेल्या आकृतिबंधाला गुरुवारी (ता. २९) महासभेत मंजुरी देण्यात आली. एकूण ९०१६ आवश्‍यक पदांची संख्या निश्‍चित करून आकृतिबंध मंजूर करण्यात आला. कालबाह्य पदे निरस्त करण्यात आली असून, त्या पदांची संख्या ६६२ आहे. (nashik NMC 9 thousand posts outline approved marathi news)

सुधारित आकृतिबंधात १९५३ पदांची नव्याने निर्मिती करण्यात आली. सफाई कर्मचारी पदांची संख्या जैसे-थे ठेवण्यात आली. त्यामुळे आऊटसोर्सिंगचे धोरण कायम राहणार असल्याचे स्पष्ट होते. शासनाच्या नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार असल्याची माहिती प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी माहिती दिली.

नाशिक महापालिकेची स्थापना झाल्यानंतर १९९५ मध्ये शासनाने ७०९२ पदांचा पहिला आकृतिबंध मंजूर केला. त्यानंतर शहर विकास होत असताना लोकसंख्यादेखील वाढली. नाशिक महापालिकेलादेखील ब वर्गाचा दर्जा मिळाला. या दरम्यान सेवानिवृत्ती व स्वेच्छानिवृत्ती तसेच अन्य कारणांमुळे रिक्त पदांची संख्या वाढली. सद्यःस्थितीत ४८०० कर्मचारी कार्यरत आहे.

महापालिकेला ब वर्ग दर्जा मिळाल्याने २०१७ मध्ये १४,४०० पदांचा नवीन आकृतिबंध शासनाला सादर केला. अनेक वर्ष शासनाकडे सदरचा आकृतिबंध मंजुरीच्या प्रतिक्षेत होता. शासनाने मागील वर्षे तो अहवाल अव्यवहार्य ठरविला. शासनाने महापालिकेला सेवाप्रवेश नियमावली मंजुरी करण्यासाठी सूचना दिल्या. महापालिकेने सेवाप्रवेश नियमावली निश्चित केली.

NMC
NMC News : प्रभाग विकासासाठी 42 कोटी 90 लाखाची तरतूद

त्याअनुषंगाने शासनाने महापालिकेला नवीन प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. सर्व विभागांचे प्रस्ताव सादर झाल्यानंतर ४९ विभागांचा सुधारित आकृतिबंधाचा एकत्रित प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर केला. महासभेची मंजुरी मिळाली. वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने सफाई कर्मचाऱ्यांची संख्या वाढणे अपेक्षित होते, परंतु जैसे-थे संख्या ठेवण्यात आल्याने आऊटसोर्सिंगला चालना देण्याचे धोरण कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले.

मुख्य अभियंता पदाची निर्मिती

सुधारित आकृतिबंधात १९५३ पदांची निर्मिती करण्यात आली आहे. मुख्य अभियंता पदाची नव्याने निर्मिती करण्यात आली. घनकचरा संचालक, सहाय्यक संचालक घनकचरा, हृदयरोगतज्ज्ञ, न्युरो फिजिशियन, न्यूरो सर्जन, गॅस्ट्रो तज्ज्ञ, किडनीरोग तज्ज्ञ, फिजिओलॉजिस्ट, शरीरशास्त्रतज्ज्ञ, औषध वैदिक शास्त्रतज्ज्ञ, इपीडे लॉजिस्ट, ज्ञान वैदिकतज्ज्ञ, कॅन्सर सर्जन, कॅन्सर फिजिशियन.

बीएएमएस वैद्यकीय अधिकारी, नेत्र सहाय्यक, दंत सहाय्यक, फिजिओथेरपिस्ट, एमएस्सी मायक्रो बायोलॉजिस्ट, एमआरआय तज्ज्ञ, सिटी स्कॅन तज्ज्ञ, ईसीजी तज्ज्ञ, केमिस्ट, समुपदेशक, पर्यावरण विभागासाठी उपअभियंता (पर्यावरण), बायोमेडिकल इंजिनिअर, सहाय्यक कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) पशुपर्यवेक्षक, बायोमेडिकल सहाय्यक, हिवताप पर्यवेक्षक, किटक संहारक, गोठा कोंडवाडा परिचर या पदांची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे.(latest Marathi News)

NMC
NMC News : सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शासन अधिकाऱ्यांच्या ‘एन्ट्री’च्या हालचाली!

''९०१६ पदांचा अंतिम आराखडा महासभेच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. यातील ६६२ पदे निरस्त करण्यात आली. प्रस्तावाला अंतिम मान्यता मिळाली आहे. आता शासनाकडे मंजुरीसाठी सादर केला जाईल.''- लक्ष्मीकांत साताळकर, प्रशासन उपायुक्त, महापालिका.

रद्द करण्यात आलेली पदे

प्रशासन अधिकारी श्रेणी अ १, शहर विकास अधिकारी १, प्रशासन अधिकारी श्रेणी ब १, लघुलेखक निम्नश्रेणी ३, सहाय्यक अधीक्षक २४, टेलिफोन ऑपरेटर २, संगणक ऑपरेटर ७, उभारक १, वेल्डर २, फिल्टर अटेंडन्स १, फोरमन २, विभागीय स्वच्छता निरिक्षक २८ पैकी १२, प्रोजेक्टनिस्ट १, खतप्रकल्पावरील इलेक्ट्रीशियन ४, वेल्डर २,. ऑटो इलेक्ट्रीशियन २, स्टोअर कीपर २, डेटा एन्ट्री ऑपरेटर २, पोकलेन ऑपरेटर ८, ट्रक वाहनचालक १४.

चारचाकी वाहनचालक ६, ऑटो मॅकेनिक २, हैड्रोलिक मॅकेनिक २, कामाठीची सर्व ९९ पदे, पेंटर ६, सुतार ८, गवंडी १०, झेरॉक्स मशिन चालक १, ऑईलमन ३, पंपचालक १, बोअर अटेंडन्स २२, केमिकल मजदूर २४, लॅब अटेंडन्स २१२, वॉचमन ११६, गंगापट्टेवाले १०, मजूर ३०, अशी ६६२ पदे रद्द करण्यात आली आहेत.

NMC
NMC News : निष्कर्ष न काढताच चौकशी समिती गुंडाळली? जाहिरात फलक घोटाळ्याचा संशय वाढला

असा आहे अंतिम आकृतिबंध

वर्ग एकूण मंजूर पदसंख्या आवश्यक पदसंख्या निरस्त पदसंख्या एकूण आवश्‍यक पदसंख्या

अ २३३ २११ ० ४४४

ब १५३ ८३ २ २३४

क २४८१ १२६५ ९९ ३६५५

ड २८५७ ३९४ ५६१ २६९०

सफाई कर्मचारी १९९३ ० ० १९९३

एकूण ७७२५ १९५३ ६६२ ९०१६

NMC
NMC News : महापालिकेत पुन्हा ‘जम्पिंग प्रमोशन’चा घाट; 3 उपअभियंत्यांची फिल्डिंग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.