NMC News : महापालिका हद्दीतील ५४४ शाळा व ६८६८ शिक्षकावर संनियंत्रण ठेवण्यासाठी कायमस्वरूपी २४ केंद्रप्रमुखांच्या पदनिर्मितीला महासभेने मंजुरी दिली आहे. या माध्यमातून शाळांवर नियंत्रण आणण्याबरोबरच प्रशासकीय कामकाजात सुटसुटीतपणा येणार आहे. नाशिक महापालिका हद्दीमध्ये खासगी अनुदानित विनाअनुदानित कायम अनुदानित व महापालिकेच्या मिळून ५४४ शाळा आहे. (nashik NMC Approval for creation of posts marathi news)
त्या शाळांमध्ये ६८६८ शिक्षक आहे, तर पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या दोन लाख ८७ हजार १३१ आहे या संपूर्ण शालेय व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. महापालिका हद्दीतील या शाळांवर संनियंत्रण करण्याची जबाबदारी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे आहे. शिक्षणाचा हक्क २००९ या कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारीदेखील महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे आहे.
महापालिकेच्या शिक्षण विभागात प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांमधूनच २४ केंद्र प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र शाळेचे कामकाज सांभाळून पुन्हा केंद्रप्रमुखांची जबाबदारी पार पाडणे शक्य होत नाही. यामुळे शालेय शिक्षणात व्यत्यय निर्माण होतो. महापालिका हद्दीतील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांवर शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी पर्यवेक्षक अधिकारी आहे.
परंतु प्रशासन अधिकाऱ्यांकडे दोन्ही जबाबदाऱ्या असल्याने संनियंत्रण ठेवणे शक्य नाही. त्यामुळे शाळांवर संनियंत्रण ठेवण्यासाठी पर्यवेक्षक यंत्रणा निर्माण करण्याचा भाग म्हणून सहा विभागांमध्ये कायमस्वरूपी २४ प्रशिक्षित पदवीधर केंद्र प्रमुखांच्या पदनिर्मितीला महासभेने मंजुरी दिली आहे.
केंद्रप्रमुखांच्या पदनिर्मितीला मंजुरी देताना केंद्रप्रमुखांना दरमहा दोन हजार रुपये अतिरिक्त वाहतूक भत्ता महापालिकेच्या शंभर टक्के खर्चातून अदा केला जाणार आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात सात लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.(latest marathi news)
महापालिका क्षेत्रातील शाळांची संख्या
विभाग शाळांची संख्या
पूर्व ७६
पश्चिम ७५
पंचवटी ११६
सिडको ११८
सातपूर ७६
नाशिक रोड ८३
एकूण ५४४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.