NMC News: नाशिक महापालिका शिक्षण मंडळ परीक्षा शुल्क परत करणार! सन 20217 मधील शिक्षक भरती प्रक्रीया

Nashik News : सन २०१७ मध्ये महापालिकेने राबविलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेतील ९७३ उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय महापालिकेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे.
NMC News
NMC Newsesakal
Updated on

नाशिक : सन २०१७ मध्ये महापालिकेने राबविलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेतील ९७३ उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय महापालिकेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. यामुळे तीन लाख २७ हजार ७०० रुपये महापालिकेकडून संबंधित उमेदवारांच्या बँक खात्यांवर दहा दिवसांत जमा होणार आहेत. त्या अनुषंगाने संबंधित उमेदवारांनी त्यांच्या बँक खात्यांची माहिती देण्याचे आवाहन प्रशासन अधिकारी बी. टी. पाटील यांनी केले आहे. (Nashik NMC Teacher Recruitment Process Year 2017 marathi news)

विनाअनुदानित मराठी माध्यमाच्या पाच व अनुदानित उर्दू माध्यमांच्या चार शाळांमध्ये मानधन तत्त्वावर २१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने जाहिरात प्रसिद्ध केली होती. यात खुल्या प्रवर्गातून ५०० व राखीव प्रवर्गातून तीनशे रुपये शुल्क इच्छुकांना भरण्याचे आवाहन केले होते.

राज्यातून ९७३ इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. परंतु महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदांची आवश्यकता नसल्याचे सांगत भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र शिक्षण विभागाकडून परीक्षा शुल्क उमेदवारांना परत केले गेले नाही. या घटनेला सहा वर्ष उलटले. (Latest Marathi News)

NMC News
Nursing CET Exam : नर्सिंगच्या सीईटी नोंदणीची मुदत 15 पर्यंत वाढविली

त्यामुळे भरतीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी न्यायालयात जाण्याची तयारी केली. त्यानंतर महापालिकेने याची गंभीर घेत उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी उमेदवारांना दहा दिवसांची मुदत दिली आहे.

या संदर्भात जाहीर नोटीसही प्रसिद्ध केली असून ज्या उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरले आहे त्यांनी बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे दहा दिवसांच्या आत जमा करण्याचे आवाहन केले आहे. बँक पासबुकची झेरॉक्स जमा केल्यानंतर उमेदवारांच्या बँक खात्यावर आरटीजीएसच्या माध्यमातून परीक्षा शुल्क वर्ग केले जाणार आहे.

NMC News
Maha Shivratri 2024: कपालेश्वर मंदिरात 51 हजार रुद्राक्षांचे वाटप! महाशिवरात्रीनिमित्ताने विश्वस्त समितीचा उपक्रम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.